मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

PM Kisan Yojana | प्रतिक्षा संपली! पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता या महिन्यात होणार जमा – Marathi News | PM Kisan Yojana Big update The 16th installment will be deposited in the bank on this day, these farmers will also benefit

नवी दिल्ली | 10 February 2024 : देशातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर घालण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार नावाजलेल्या योजनांची अंमलबजावणी करते. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (PM Kisan Yojana) ही लोकप्रिय योजना त्यातीलच एक आहे. या योजनेत दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात 6 हजार रुपयांच्या आर्थिक सहाय्य करण्यात येते. दोन हजारांचे तीन हप्ते लाभार्थी, पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येतात. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ही योजना वरदान ठरली आहे. शेतकरी या योजनेच्या 16 व्या हप्त्याची प्रतिक्षा करत आहेत. त्यांच्यासाठी आनंदवार्ता आली आहे. कधी जमा होणार हा हप्ता?

15 हप्ते झाले जमा

ऑक्टोबर 2022 मध्ये या योजनेतंर्गत 12 वा हप्ता जमा करण्यात आला होता. फेब्रुवारी 2023 मध्ये 13 वा हप्ता जमा करण्यात आला. 27 जुलै रोजी 14 हप्ता जमा झाला. नोव्हेंबर महिन्यात केंद्राने 15 वा हप्ता जमा केला होता. साधारणतः पाच महिन्यांच्या अंतराने रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वळती झाली आहे. आता 16 व्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. शेतकऱ्यांना प्रत्येकी 2000 रुपयांप्रमाणे एकूण 6 हजार रुपये देण्यात येतात. DBT माध्यमातून ही रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होते.

हे वाचलंत का? -  शेतकऱ्याने लावला निळा, जांभाळा रंगाचा भात, मग चर्चा तर होणारच...फायदे तरी काय... - Marathi News | Blue rice planted by a farmer in Pune district, Rs. 250 per kg marathi news

हे सुद्धा वाचा



वंचित शेतकऱ्यांना पण लाभ

अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ बंद झाला आहे. कागदपत्रांची पूर्तता न केल्याने हप्ता थांबविण्यात आला आहे. आता ही अडचण दूर करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालय या खास मोहिम राबविणार आहे. 12 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी दरम्यान पीएम किसान सन्मान निधी योजनेतंर्गत शेतकऱ्यांच्या समस्या, अडचणी सोडविण्यासाठी अभियान राबविण्यात येईल. या अभियानात प्रत्येक राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाचा सहभाग असेल. देशभरातील 4 लाखांहून अधिक कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून गावोगावी हे अभियान राबविण्यात येणार आहे.

हे वाचलंत का? -  खुशखबर! या जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मिळणार पीक विमा; जाणून घ्या माहिती..!

16 वा हप्ता कधी मिळणार

हे वाचलंत का? -  PM Kisan Yojana : अजून पण नाही मिळाला 18 वा हप्ता? मग येथे थेट करा तक्रार - Marathi News | PM Kisan Yojana, Still not received 18th installment? not credit 2000 rupees on your bank account Then complain directly here

मीडिया रिपोर्ट्सनुसार, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता आहे. या फेब्रुवारी अथवा पुढील मार्च महिन्यात पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे. अर्थात केंद्र सरकारने याविषयीची अधिकृत घोषणा केलेली नाही.


Web Title – PM Kisan Yojana | प्रतिक्षा संपली! पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता या महिन्यात होणार जमा – Marathi News | PM Kisan Yojana Big update The 16th installment will be deposited in the bank on this day, these farmers will also benefit

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj