मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

पंजाब डख यांचा नवीन अंदाज आला.. या भागात पडणार जोरदार पाऊस Panjab dakh navin andaj

Panjab dakh navin andaj: आज दिनांक 14 जुलै रोजी मराठवाड्यातील प्रसिद्ध हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख यांच्याद्वारे पावसाबद्दल एक नवा अंदाज वर्तवला गेला आहे. पंजाबराव डख यांच्याद्वारे मागील अंदाजात म्हटल्याप्रमाणे विदर्भात 4 जुलैपासून पावसाला सुरुवात झाली असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. आता पंजाबराव डख यांनी त्यांच्या आजच्या ह्या नव्या अंदाजात काय माहिती दिली आहे ते आपण जाणून घेऊया. (Panjab Dakh)

(Panjab dakh navin andaj) पंजाबराव डख यांच्याद्वारे देण्यात आलेल्या नव्या अंदाजात शेतकऱ्यांसाठी एक फार चांगली बातमी समोर आली आहे. विदर्भात चांगला पाऊस पडायला सुरुवात झाली असून, उद्यापासून उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रात पाऊस पडेल, असे त्यांनी आपल्या अंदाजात म्हटले आहे. 25 जुलैपर्यंत राज्यामधील पाऊस विभाग बदलून मुसळधार कोसळणार पडेल, असेही त्यांनी आपल्या नव्या अंदाजात म्हटले आहे.

पंजाबराव डख यांचे म्हणणे आहे की, बंगालच्या उपसागरात जुलैमध्ये सरासरी कमी दाबाची स्थिती नसते, परंतु यावर्षी 15 जुलै दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाची स्थिती निर्माण होईल आणि त्याच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमी दाबाचा प्रवाह महाराष्ट्रात सरकल्याने पाऊस इतका तीव्र होईल की नदीचे प्रवाह वाढतील असेही ते पुढे म्हणाले आहेत. (Panjabrao Dakh Weather Update)

हे वाचलंत का? -  PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेचा मिळेल लाभ, लवकर करा हे काम - Marathi News | PM Kisan Samman Nidhi Yojana If you want the 15th installment of PM Kisan Yojana, then do it quickly, the process is easy

loan waiver Update 2024 : सुप्रीम कोर्टाचा निर्णय, सर्व शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ होणार, लाभार्थी यादी पहा

पंजाब राव डखच्या अंदाजानुसार, 25 जुलैपर्यंत महाराष्ट्रात एकंदरीतच मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं दिसून येत आहे.

ठाणे, पनवेल आणि पालघर जिल्ह्यांसह नवी मुंबईतही मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

दरम्यान, आज ठाणे, पनवेल परिसर आणि नवी मुंबईत मुसळधार (mumbai weather update) पावसाने कहर केला आहे. मुसळधार पावसामुळे सगळच जलमय झाले आहे. रस्त्यांचे नद्यांमध्ये रूपांतर झाले असून अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले असल्याचं दिसून येत आहे.

अनेक चारचाकी व दुचाकी पाण्यात वाहून गेल्याच्या घटनाही घडल्या आहेत. काही नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. प्रशासनाद्वारे या पार्श्वभूमीवर नागरिकांना योग्य ती खबरदारी आणि काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हे वाचलंत का? -  इंजिनीअरिंग सोडली, औत धरला... गडी फक्त बारा एकरात कमावतोय लाखो रुपये - Marathi News | Nandurbar Farmer sagar patil Farming Success Story Marathi

नागरिकांना घरामधे पाणी शिरल्याने, घराबाहेर पडण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. आता या पावसामुळे लोकल सेवेवरही परिणाम झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यासोबतच बऱ्याच भागांत आणि रस्त्यांवर पाणी साचले आहे आणि याचा परिणाम म्हणून वाहतूकही विस्कळीत झाली असल्याचे चित्र आहे.

येथे वाचा – Google Pay loan गूगल पे देत आहे ५ मिनिट २ लाख पर्यंतचे कर्ज, येथे पहा संपूर्ण माहिती..


Web Title – पंजाब डख यांचा नवीन अंदाज आला.. या भागात पडणार जोरदार पाऊस..!

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj