मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

Buldhana Bear attack : बकऱ्या चारणाऱ्या शेतकऱ्यावरती अस्वलाचा हल्ला, जीव वाचवण्यासाठी वृद्धाने लढवली अनोखी शक्कल – Marathi News | Buldhana Bear attack on farmer at dnyanganga wildlife sanctuary

गणेश सोलंकी, बुलढाणा : एखाद्या व्यक्तीवर प्राण्याने हल्ला (Buldhana Bear attack) केला असं आपण रोजचं ऐकत आहे. महाराष्ट्रात (maharashtra news) अशी घटना कुठे न कुठे तरी घडत असते. विशेष म्हणजे बिबट्याच्या हल्ल्याचं प्रमाण महाराष्ट्रात अधिक आहे. रोज बिबट्याच्या हल्ल्याच्या किंवा दिसणाऱ्याच्या घटना कानावर पडत आहेत. काल बुलढाणा (buldhana Bear) जिल्ह्यात शेळी चारण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्यावर अस्वलाने अचानक हल्ला केला. त्यावेळी शेतकऱ्याने धाडस दाखवल आणि सोबत असलेल्या कुऱ्हाडीने त्या अस्वलावरती हल्ला केला. त्यामुळे अस्वल जंगलात पळून गेले आहे. विशेष म्हणजे हा हल्ला त्यांच्या स्वत:च्या बचावासाठी केला असल्याचे सांगितले आहे.

त्यांच्याकडे लाकूड तोडण्यासाठी घेऊन गेलेली कुऱ्हाड होती

बुलढाणा जिल्ह्यातील डोंगरशेवली येथील दयाराम सोनुने हे आपल्या बकऱ्या चारण्यासाठी ज्ञानगंगा अभयारण्य लगतच्या गुलदरी शिवारात गेले होते. त्यावेळी तिथं सायंकाळच्या सुमारास झुडपातून अचानक एका अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी त्यांच्याकडे लाकूड तोडण्यासाठी घेऊन गेलेली कुऱ्हाड होती. त्यांनी स्वत:चा बचाव करण्यासाठी कुऱ्हाडीचा वापर केला आहे.

हे वाचलंत का? -  या जुगाडाने केली कमाल, गायी 40 टक्के अधिक दूध देतात - Marathi News | With this one trick, VR Glasses the cow gives 40 percent more milk, a maximum for Russia's techno savvy farmers

डोक्याला इजा झाली आहे

शेतकऱ्यांचं आक्रमक रुप पाहून घाबरलेलं अस्वल जंगलात पळून गेल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या हल्ल्यात दयाराम सोनुने यांच्या डोक्याला इजा झाली आहे. त्यांना उपचारासाठी बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा



हे वाचलंत का? -  ‘किटली’ साठी शेतकऱ्याने मोजले 21 लाख; वाजत-गाजत केले स्वागत, पाहायला लोटली पंचक्रोशी

अस्वल हे खूप भयानकपणे हल्ला करते

अचानक एखाद्या प्राण्याने हल्ला केल्यानंतर काय करावं किंवा त्यावेळी कुणाला काय सुचत नाही. परंतु अस्वलाने ज्यावेळी हल्ला केला, त्यावेळी शेतकऱ्याने धाडस दाखवल्यामुळे त्या जीव वाचला आहे. अस्वल हे खूप भयानकपणे हल्ला करते. त्याचबरोबर त्यांच्या तावडीतून निसटणे सुध्दा अवघड असते.


Web Title – Buldhana Bear attack : बकऱ्या चारणाऱ्या शेतकऱ्यावरती अस्वलाचा हल्ला, जीव वाचवण्यासाठी वृद्धाने लढवली अनोखी शक्कल – Marathi News | Buldhana Bear attack on farmer at dnyanganga wildlife sanctuary

हे वाचलंत का? -  या पद्धतीने करा तुमच्या घराचं स्वप्न साकार! जाणून घ्या, गृहकर्ज फक्त 13 वर्षांत फेडण्याचा स्मार्ट फॉर्म्युला!

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj