मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

Nashik Tomato : नाशिकमध्ये टोमॅटोचा दर उतरला, 20 किलोच्या कॅरेट्सला 1200 रुपयांचा दर, जाणून घ्या एक किलोचा दर – Marathi News | Nashik tomato rate Down Nashik Bajar Samiti central government take dision

नाशिक : देशात टोमॅटो (Tomato Rate) किती महाग झाला हे सगळ्यांनी पाहिलं, त्याचबरोबर त्याची चर्चा सुध्दा सगळीकडं झाली. महाराष्ट्रातल्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना टोमॅटोच्या पिकामुळे चांगले पैसे मिळाले. केंद्र सरकारने नेपाळहून टोमॅटोची आयात करण्याचा निर्णय घेतल्यापासून टोमॅटोचे देशातील दर कमी झाले आहेत. विशेष म्हणजे नाशिकच्या जितक्या बाजार समित्या (Nashik Bajar Samiti) आहेत. तिथं टोमॅटोचा दर (Tomato Rate Down) निम्म्यावर आला आहे. 20 किलोचे कॅरेट्स 2200 दर होता. तो दर आता अकराशे ते बाराशे रुपयांवर आला आहे, त्यामुळे सामान्य नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

हे वाचलंत का? -  M. S. Swaminathan : शेतकऱ्यांना बळ देणारा MSP अन् 'तो' फॉर्म्युला; स्वामिनाथन अहवाल नेमका काय आहे? - Marathi News | Mumbai M S Swaminathan Passed Away Harit Kranti swaminathan aayog report Farmer Marathi News

भाव पडला असल्याची खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत

केंद्र सरकारने टोमॅटोच्या आयातीचा निर्णय घेतल्यामुळे बंगळुरूच्या बाजारपेठेत वाढलेल्या आवकेमुळे टोमॅटोच्या दरात चांगलीचं घसरण झाली आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी जो 20 किलोचे कॅरेट्स 2200 दर होता. तो एकदम कमी झाला आहे. सध्या 1100 ते 1200 रुपये असा दर मिळत आहे. सध्या एक किलो टोमॅटो १०० किलो रुपयाने मिळत आहेत. मागच्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना चांगले दिवस आले होते. परंतु केंद्र सरकारने नेपाळहून टोमॅटो खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भाव पडला असल्याची खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत.

हे वाचलंत का? -  पावसाअभावी बळीराजा हतबल, महिनाभरापासून पाऊस गायब झाल्यामुळे... - Marathi News | The drought situation in maharashtra Rain update farmer crop agricultural news

हे सुद्धा वाचा



सामान्य नागरिकांनी टोमॅटो खरेदी करणं बंद केलं

मागच्या महिनाभरात देशात टोमॅटोचे भाव इतके वाढले की, लोकांच्या जेवणातून टोमॅटो हद्दपार झाला होता. २०० रुपये किलो टोमॅटो झाल्यामुळे सामान्य नागरिकांनी टोमॅटो खरेदी करणं बंद केलं होतं. पण शेतकऱ्यांच्या पिकाला चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान पाहायला मिळत होतं. परराज्यात किरकोळ बाजारात ग्राहकांना 200 ते 250 रुपये किलो खरेदी करावा लागत होता. टोमॅटोची दर वाढ झाल्याने नागरिकांची ओरड सुरु होती. परंतु केंद्र सरकारने टोमॅटो आयातीचा निर्णय घेतला आणि टोमॅटोला दर घसरला असल्याचं नाशिकमधील शेतकरी सांगत आहेत.

हे वाचलंत का? -  भाजीपाला सोडून सुरू केली शिंगाडा शेती, आता दरवर्षी कमावतो १५ लाख रुपये - Marathi News | The farmer left vegetables and started Shingada farming


Web Title – Nashik Tomato : नाशिकमध्ये टोमॅटोचा दर उतरला, 20 किलोच्या कॅरेट्सला 1200 रुपयांचा दर, जाणून घ्या एक किलोचा दर – Marathi News | Nashik tomato rate Down Nashik Bajar Samiti central government take dision

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj