मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

महाराष्ट्रातल्या शेतीच्या बातम्या एका क्लिकवर, जाणून घ्या पावसाची अपडेट तुमच्या जिल्ह्यातील – Marathi News | Maharashtra farmer news kharip season rain update agricultural news

महाराष्ट्र : वाशिम (washim news) जिल्ह्यात काही खरीप हंगामातील (kharip season) पिके सध्या वाढीस लागली आहेत. मात्र पावसाने पाठ फिरवली असून दिवसभर कडक आहे. या प्रतिकुल परिस्थतीमुळे बहरलेली पिके कोमेजून जात आहेत. उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याचे संकेत आहेत. यामुळे शेतकरी (farmer news in marathi) चिंताग्रस्त झाले असून पावसाची आतुरतेने प्रतिक्षा करित आहेत. त्यासाठी वाशीमच्या कारंजा तालुक्यातील बाबापूर येथील चिमुकल्यानी पावसासाठी साकडे घालत असून त्याकरिता कमरेला लिंबाच्या झाडाची पाने गुंडाळून चिमुकल्यांनी ‘धोंडी धोंडी पाणी दे’चा गजर करत असून यातून भरभरून पाऊस कोसळू दे आणि पिकलेले रान हिरवेगार राहू दे, अशी आर्त हाक देत गावोगावी धोंडी धोंडी पाणी दे अशी वरूणराजाला साकडे घातले जात आहे.

अहमदनगर जिल्ह्यासह राज्यातील शेतकरी पावसामुळे संकटात सापडला आहे. पाऊस जर पडला नाही, तर नागरीकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होणार आहे. या संकटातून नागरिकांना बाहेर काढावं, यासाठी महादेवाला साकडं घालण्यात आलं आहे. हर हर महादेव ग्रुपच्या सदस्यांनी ये रे ये रे पावसा या गितावर नाचत खांडेश्वर महादेवाची बेलपत्राने पूजा केली आहे.

हे वाचलंत का? -  Farmer News : संतापलेल्या शेतकऱ्याने दीड एकर मूग पिकावर फिरवला ट्रॅक्टर, कारण सांगितल्यानंतर... - Marathi News | Kharif season affected by changing climate

जळगाव जिल्ह्यात 32 महसूल मंडळामध्ये एक महिन्यापासून पावसाची दांडी खरिपाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान पिक विम्याची 25% रक्कम तात्काळ द्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विवेक सोनवणे अशी मागणी केली आहे.

हे सुद्धा वाचा



लातूर जिल्ह्यातील तीरु नदीची पाणीपातळी जोत्याखाली आली असून सप्टेंबर महिन्यात मोठा पाऊस न झाल्यास भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. जिल्ह्यातील जळकोट, उदगीर, चाकूर तालुक्यात तिरू नदीचे पात्र विस्तारले असून अर्धा पावसाळा उलटूनही पाऊस न झाल्याने तिरु नदीचे पात्र तहानलेलेच आहे.

लातूर जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणच्या पावसाच्या नोंदी ह्या चुकीच्या असल्याचे समोर आले आहे. पानगाव आणि रेणापूर भागात पाऊस पडलाच नाही, मात्र पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे पावसाची नोंद करण्याचे काम करणाऱ्या स्कायमेट कंपनीवर शेतकरी आता आरोप करू लागले आहेत. गावातल्या एखाद्या छतावर पाऊस नोंदणीसाथीचा डबा ठेवण्यात आला आहे, त्यामध्ये जमा झालेले पाणी नळीमध्ये टाकून पावसाचे प्रमाण मोजण्यात येते. पळशी येथील ज्या शेतकऱ्याच्या घरावर हा पर्जन्यमापक बसविला आहे.

हे वाचलंत का? -  शेतकर्‍यांसाठी आनंदवार्ता, सोयाबीन खरेदीसाठी नका लावू लांबच लांब रांगा, इतक्या दिवसांची मुदत वाढ

परभणीच्या सेलू येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे यंदाच्या हंगामात 5 लाख क्विंटल रेकॉर्ड कापूस खरेदी करण्यात आली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कापसाची आवक वाढली, मात्र माफक दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.


Web Title – महाराष्ट्रातल्या शेतीच्या बातम्या एका क्लिकवर, जाणून घ्या पावसाची अपडेट तुमच्या जिल्ह्यातील – Marathi News | Maharashtra farmer news kharip season rain update agricultural news

हे वाचलंत का? -  शेतकऱ्यांनो या तारखे दरम्यान परतीच्या पावसाचा तडाखा.. या भागांना पाऊस झोडपणार!

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj