Nandurbar Red Chillies | नंदूरबार बाजारपेठेत यंदा मिरच्यांची विक्रमी आवक, दर कोसळल्याने शेतकरी चिंतेत – Marathi News | In Nandurbar market this year, the price of chillies fell due to the arrival of more than two lakh quintals

[ad_1]

जितेंद्र बैसाणे, टीव्ही 9 मराठी, प्रतिनिधी, नंदूरबार | 17 जानेवारी 2024 : देशातील दुसऱ्या क्रमांकांची मिरचीची बाजारपेठ म्हणून ओळख असणाऱ्या नंदुरबार बाजार समितीत यावर्षी मिरचीची विक्रमी आवक येत आहे. आतापर्यंत दोन लाख क्विंटल मिरचीची खरेदी झाली आहे. पुढील दीड महिना मिरचीची आवक अशीच सुरू राहण्याचे अंदाज बाजार समितीने व्यक्त केला आहे. मिरचीची आवक जादा असल्याने मिरचीचा दर घसरला आहे. आठवडाभरापासून ढगाळ वातावरणामुळे बाजार समितीतील खरेदी विक्रीच्या व्यवहार बंद होता. मात्र सोमवारपासून पुन्हा बाजार समिती सुरू झाली आहे. मिरचीची खरेदी पुन्हा सुरु झाली असली तरी जादा आवक झाल्या मिरचीचे दर चांगलेच घसरले आहेत. सध्या मिरचीला दोन हजार पासून ते चार हजारपर्यंतचा भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

देशातील सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकाची मिरचीची बाजारपेट म्हणून नंदूरबारला ओळखले जाते. यंदाच्या अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणातही यंदा येथे मोठ्या प्रमाणात मिरच्या विक्रीसाठी आल्या आहेत. नंदूरबार कृषी उत्पन्न बाजार समितीतीत यंदा मिरचीची विक्रमी आवक आली आहे. आतापर्यंत दोन लाख क्वींटल मिरच्यांची खरेदी येथे झाली आहे. पुढील दीड महिने मिरच्याचा आवक सुरुच रहाणार असल्याचा अंदाज आहे. मिरचीचा पुरवठा जादा झाल्याने दरावर परिणाम झाला आहे. आधीच यंदाच्या अनियमित पावसाने शेतकरी आधीच संकटात असताना आता मिरचीच्या विक्रीतून खर्चही वसुल होत नसल्याने शेतीचा व्यवसाय आतबट्ट्याचा ठरत असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.

खर्चही वसुल होईना

सध्या मिरचीला दोन ते चार हजार रुपयांचा दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. मिरचीच्या लागवडीसाठी त्यानंतर फवारणी आणि काढणी तसेच वाहतूकीचा खर्च मोठा आहे. परंतू त्याप्र्माणात भाव मिळत नसल्याचे बळीराजा नाराज आहे. यामुळे केलेला खर्च देखील निघत नसल्याने शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत असल्याचे शेतकरी रवींद्र मराठे आणि रामकृष्ण चौधरी यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या मिरचीची पावडरला चांगला भाव मिळतो. मग शेतकऱ्यांच्या मिरचीला का नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.

[ad_2]
Web Title – Nandurbar Red Chillies | नंदूरबार बाजारपेठेत यंदा मिरच्यांची विक्रमी आवक, दर कोसळल्याने शेतकरी चिंतेत – Marathi News | In Nandurbar market this year, the price of chillies fell due to the arrival of more than two lakh quintals

Leave a Comment