मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

Lemon Grass : कमी खर्चात व्यवसाय सुरू करण्याची कल्पना, २० हजार गुंतवा इतके लाख कमवा – Marathi News | Plant 20,000 lemon grass and get income for six years

नवी दिल्ली, २ सप्टेंबर २०२३ : कमी खर्चात जास्त नफा मिळत असेल तर ते उत्पादन घेण्यास शेतकरी प्राधान्य देतात. यासाठी सर्व लोकं मेहनत करतात. परंतु, यश मिळेल, याची काही शास्वती नसते. यश प्राप्त करण्यासाठी नवनवीन कल्पना लढवाव्या लागतात. तुमची कल्पना चांगली नसेल तर पैसे खर्च करूनही त्यात फायदा होत नाही. आता तुम्हाला अशा व्यवसायाबद्दल सांगणार आहेत ज्यात २० पट फायदा मिळू शकतो. शेतीमध्ये व्यवसात करू इच्छित असाल तर लेमन ग्रास चांगला पर्याय आहे. कमी खर्चात जास्त फायदा होऊ शकतो. लेमन ग्रास ही एक औषधी आहे. लेमन ग्रासपासून सुगंधित प्राडक्ट तयार केले जातात. यापासून औषधी तयार केली जाते. औषधी गुण असल्याने सहसा कोणताही रोग होत नाही. यामुळे लेमन ग्रासचे कोणतेही नुकसान होत नाही.

हे वाचलंत का? -  शेतकऱ्याने फिरवला वांग्याच्या शेतात ट्रॅक्टर, बाजारात भाव मिळच नसल्यामुळे शेतकरी संतापला - Marathi News | The farmer turned the tractor in the brinjal field, the farmer got angry because the price was not available in the market

पंतप्रधान मोदी यांनी केले होते कौतुक

विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमध्ये लेम ग्रासचा उल्लेख केला होता. झारखंडमधील बिशूनपूर येथे लेमन ग्रासची शेती करणाऱ्या ३० लोकांच्या समुहाचे कौतुक केले होते. लेमन ग्रास हे व्यवसायिक उत्पादन आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात याची मागणी जास्त आहे. यापासून साबून, तेल, औषधींसह सौंदर्य प्रसाधनांच्या वस्तू तयार केल्या जातात.

हे सुद्धा वाचा२० हजार रुपयांत सुरू करा व्यवसाय

पडिक जमिनीत लेमन ग्रासची लागवड केली जाऊ शकते. जमीन सुपीक करण्याची गरज पडत नाही. २० हजार रुपये खर्च करून तुम्ही लेमन ग्रासची शेती करू शकता. एका हेक्टरचा खर्च २० हजार रुपये येतो. सहा वर्षात यापासून ४ ते ५ लाख रुपयांचा नफा मिळतो. एक वेळा लागवड केल्यानंतर ४ ते ६ वेळा उत्पादन काढता येते.

हे वाचलंत का? -  कर्टुला लागवडीतून शेतकरी झाला मालामाल, तीन महिन्यांत ९ लाखांचे उत्पन्न - Marathi News | Nanded farmer earns lakhs from curtula cultivation

बाजारात तेलाला मोठी मागणी

लेमन ग्रास पहिल्यांदा कापल्यानंतर एका हेक्टरमधून २५ किलो तेल तयार करता येते. दुसऱ्यांदा कापल्यानंतर ७० लीटर तेल काढता येते. प्रत्येकवेळा कापताना उत्पादन वाढत असते. आता बाजारात हे तेल १२०० ते १५०० रुपये लीटर आहे. लेमन ग्रासची सहा वेळा कटाई केल्यानंतर ४ ते ५ लाख रुपयांचा नफा मिळतो.


Web Title – Lemon Grass : कमी खर्चात व्यवसाय सुरू करण्याची कल्पना, २० हजार गुंतवा इतके लाख कमवा – Marathi News | Plant 20,000 lemon grass and get income for six years

हे वाचलंत का? -  RICE CROP | राज्यातील भात पिकाचे उत्पन्न घटण्याची शक्यता - Marathi News | There is a possibility that the income of the rice crop in the state will decrease

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj