मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

Pune Farmer | काही महिन्यांपूर्वी टोमॅटोने तर आता डाळिंबाने दिला सर्वोच्च भाव – Marathi News | Pomegranate farmer got the highest price in pune district market committee

पुणे | 2 ऑक्टोंबर 2023 : देशातील शेतकऱ्यांना नेहमी बिकट परिस्थितीचा सामना करावा लागतो. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीचे संकट शेतकऱ्यांसमोर असते. ही संकटे आली नाही तर शेतमालास भाव मिळत नाही. या परिस्थितीत शेतकरी पुन्हा नवीन जोमाने काम करत असतो. हा हंगाम नाही तर पुढचा हंगाम चांगला येईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना असते. पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन महिन्यांपूर्वी टोमॅटोने चांगला दर दिला होता. टोमॅटो उत्पादक काही शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांची कमाई झाली होती. परंतु त्यानंतर टोमॅटोचे दर घसरले आणि टोमॅटो रस्त्यावर फेकण्याची वेळी आली. आता डाळिंबाने चांगले दिवस शेतकऱ्यांना आणले आहे.

हे वाचलंत का? -  50 टन डाळिंबाच्या उत्पन्नातून सत्तर लाख कमावले - Marathi News | Seventy lakhs were earned from the yield of 50 tons of pomegranates

किती मिळाला डाळिंबाला दर

पुणे जिल्ह्यातील आळेफाटा बाजार समितीत डाळिंबाला आतापर्यंतचा सर्वोच्च दर सोमवारी मिळाला. डाळिंबाच्या 20 किलोच्या एका क्रेटला 14 हजार 500 रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे व्यवस्थापक प्रशांत महाबरे यांनी दिली. आळेफाटा बाजार जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीत येतो. हा उपबाजार कांद्यांचा लिलावासाठी प्रसिद्ध आहे. आता डाळिंबाचा लिलाव होऊ लागला आहे. बाजार समितीत अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथील शेतकरी विवेक अविनाश रायकर यांनी आपले डाळिंब आणले होते.

क्रेटला काय मिळाला दर

विवेक रायकर यांच्या डाळिंबास वीस किलोच्या एका क्रेटला तब्बल 14 हजार 500 रुपयांचा भाव मिळाला आहे. म्हणेजच एका किलोस 725 रुपये हा सर्वोच्च दर मिळाला. दुसऱ्या डाळिंबाच्या एका क्रेटला 11 हजार तर तिसऱ्या क्रेटला 10 हजार रुपये दर मिळाला. त्यांचा चार नंबरच्या डाळिंबास सहा हजार तर पाच नंबरच्या डाळिंबाच्या एका क्रेटला चार हजार दर मिळाला. बाजार समितीत डाळिंबाला चांगला दर मिळाल्यामुळे हे मार्केट चर्चेत आले आहेत आणि शेतकरी समाधानी झाला आहे.

हे वाचलंत का? -  निरक्षर शेतकऱ्याचा व्यापाऱ्यांना धक्का, असे मिळवले ८० लाखांचे उत्पन्न - Marathi News | The farmer earned 80 lakh rupees from pomegranate cultivation

हे सुद्धा वाचा



पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील शेतकरी रमेश गाडेकर यांच्या डाळिंबाला गेल्या आठवड्यात चांगला दर मिळाला होता. त्यांच्या 26 किलो डाळिंबाच्या एका क्रेटला 16 हजार रुपये मिळाले होते. म्हणजेच किलोस 615 हा दर त्यांना राहाता बाजार समितीत मिळाला होता.


Web Title – Pune Farmer | काही महिन्यांपूर्वी टोमॅटोने तर आता डाळिंबाने दिला सर्वोच्च भाव – Marathi News | Pomegranate farmer got the highest price in pune district market committee

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj