मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

शेतकऱ्याची कमाल, कचऱ्यातून निर्माण केली संपत्ती, महिना 16 लाखांची कमाई – Marathi News | Farmer Gurpreet Singh of Punjab earns 16 lakhs per month by selling farm waste

पंजाब | 22 ऑक्टोबर 2023 : पंजाबात शेतकऱ्यांकडून पराळी म्हणजे शेतातील पिक काढून झाल्यानंतर उरलेले तण जाळण्याच्या घटनांमुळे दिल्ली सारख्या महानगरातील प्रदूषण वाढत आहे. गेल्या 24 तासांत अशा 89 केसेस दाखल झाल्या असून अशा एकूण घटनांची संख्या 1,319 इतकी झाली आहे. असे असताना येथील मालेरकोटला मधील कुथाला गावचे 26 वर्षीय गुरप्रीत सिंह कुथाला यांनी मात्र शेतातील कचऱ्यातून अक्षरश: सोनं निर्माण केलं आहे. काय आहे या प्रगतीशील शेतकऱ्याचं कचऱ्यातून संपत्ती निर्माण करण्याचं तंत्र पाहूयात..

गुरप्रीत सिंह याने इतर शेतकऱ्याप्रमाणे शेतातील टाकाऊ पिकाचं तण न जाळता त्यांच्यातून पैशांची कमाई केली आहे. त्यानं गेल्यावर्षी भाताचे पिक घेतल्यानंतर उरलेला कचरा न जाळता त्यातून 16 लाख रुपये कमविले आहेत. पंजाब आणि उत्तर प्रदेशातील अनेक शेतकरी आपली जबाबदारी टाळत पुढच्या पिकाची तयारी करण्यासाठी सोपा उपाय म्हणून शेतातील उरलेले तण जाळून टाकतात. 15 ते 20 दिवसात दुसरे पिक घेण्याची तयारी करतात. परंतू अशाप्रकारे शेतातील कचरा जाळल्याने राजधानी दिल्ली परिसरातून प्रचंड प्रदुषण तयार होत असल्याने अशा प्रकारे तण जाळण्यावर बंदी घातली आहे.

हे वाचलंत का? -  पाऊस सुरु झाल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा, शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत - Marathi News | Maharashtra farmer news tur Pulses rates incraesed agricultural news in marathi

पंजाब सरकारने एक्सवर ( आधीचे ट्वीटर ) रविवारी पोस्ट टाकीत या तरुण प्रगतीशील शेतकरी गुरुप्रीत यांनी पर्यावरणाची संरक्षण केल्याबद्दल त्याचे अभिनंदन केले आहे. त्याला पंजाब सरकाने आपल्या शेतातील तण न जाळता पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या मोहिमेचा सदिच्छादूतच केले आहे.

पंजाब सरकारने केलेली पोस्ट –

गुरप्रीतने कशी काय केली कमाई ?

गुरप्रीत याने इतर शेतकऱ्याप्रमाणे शेतातील टाकाऊ पिकाचा कचरा न जाळता त्यावर पर्यावरणीय उत्तर शोधून काढले आहे. त्याने पंजाब सरकारच्या 50 टक्के सबसिडीतून शेत कचरा बारीक करणारे यंत्र विकत घेतले आहे. 12 वी पास असलेल्या गुरप्रीत याचे स्वत:चे दहा एकराचे शेत आहे. तर 30 एकर शेती त्याने भाड्यावर घेतली आहे. त्याने गेल्यावर्षी पंजगराईन ( Panjgaraian ) येथील पंजाबच्या संगरुर जिल्ह्यातील RNG बायोगॅस प्लांटशी एक करार केला आहे. त्याने या बायोगॅस प्लांटला 12,000 क्वींटल पिकाचा उरलेला कचरा विकून 16 लाखाची कमाई केल्याची पोस्ट पंजाब येथील आप पक्षाने एक्सवर शेअर केली आहे.

हे वाचलंत का? -  टोमॅटोच्या झाडाला लागलेत बटाटे, शेतकऱ्यांना दुहेरी फायदा देणारे तंत्रज्ञान - Marathi News | Potatoes and tomato in one plant, tree grown in agricultural exhibition in Baramati marathi news

चार नवीन मशिन विकत घेतल्या

गुरप्रीत याने यावर्षी 28,000 क्वींटल शेतातील टाकाऊ पदार्थ विकून 1 कोटी रुपये कमविण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या मोसमात गुरुप्रीत याने त्याचा सहकारी मित्र सुखविंदर सिंह याच्या मदतीने संगरुर प्लांटला 160 रु. प्रति क्वींटल अधिक प्रति खेप 10 रु.वाहतूक खर्च या पद्धतीने 18,000 क्वींटल भाताचा कचरा विकण्यासाठी चार नवीन मशिन विकत घेतल्या आहेत.



Web Title – शेतकऱ्याची कमाल, कचऱ्यातून निर्माण केली संपत्ती, महिना 16 लाखांची कमाई – Marathi News | Farmer Gurpreet Singh of Punjab earns 16 lakhs per month by selling farm waste

हे वाचलंत का? -  बुलढाणा जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची बातमी एका क्लिकवर - Marathi News | Maharashtra farmer news agricultural news rain update draout situation

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj