मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

पाऊस सुरु झाल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा, शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत – Marathi News | Maharashtra farmer news tur Pulses rates incraesed agricultural news in marathi

महाराष्ट्र : कडधान्यातील मुख्य असलेल्या तूर (tur rate hike) या पिकानंतर आता उडीद आणि मूग या शेतमालाचेही दर वाढत आहेत. वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये दोन्ही कडधान्याचे दर (Pulses rates) सात हजार रुपये प्रती क्विंटलच्यावर गेले आहेत. शेतकऱ्यांकडे हा शेतमाल जास्त प्रमाणात शिल्लक नसून पुढील काळातही आवक कमीच राहण्याची शक्यता आहे. तुरीला 10 हजार 200 तर उडीद व मुंगाला 7 हजार 100 प्रतिक्विंटल दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये (farmer news in marathi) आनंद वातावरण आहे. जोपर्यंत शेतमालाची बाजारात आवक वाढत नाही तोपर्यंत दर असेच राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.

हे वाचलंत का? -  महाराष्ट्रात पाऊस गायब झाल्याने शेतकरी चिंतेत - Marathi News | All maharashtra farmer news in marathi nagpur sindhurg nashik amravati

पावसाची प्रतिक्षा कायम

परभणी जिल्ह्यात अनेक दिवसांच्या उघडीपीनंतर गेल्या 24 तासात परभणीत हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. सरासरी 1.2 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. मात्र शेतकऱ्यांना अद्याप ही मोठ्या पावसाची प्रतिक्षा कायम आहे.

धुळे तालुक्यातील शिवारात मक्यावर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे उत्पन्नात घट येण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून लांबलेला पाऊस आणि वातावरणातला मोठा बदल, त्याचा परिणाम आता माथ्यावर झाला आहे. पिकांवर अळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पन्नात घट येणार आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असून दोन वेळा फवारणी केली आहे. चांगला पाऊस झाला नाही तर अळी नष्ट होणार नाही, त्यामुळे उत्पन्नात घटनेने अशी चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

हे वाचलंत का? -  monsoon | मॉन्सूनचा फटका खरीप हंगामास, कमी पावसामुळे शेतमालाच्या उत्पादनावर परिणाम, काय आहे अंदाज - Marathi News | Monsoon short in Maharashtra, Kharif season production will decrease this year

हे सुद्धा वाचा



नंदुरबार जिल्ह्यात काही भागात चांगला पाऊस सुरु झाला आहे. भाजीपाल्याचे आवक वाढली आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे भाव चांगलेच कमी झाले आहेत. ठराविक भाजीपाला महाग झाला आहे. सर्वाधिक कमी भाव टमाटे आणि हिरव्या मिरचीचे कमी झाले आहेत. भाजीपाल्याची आवक वाढल्याने शेजारील असलेल्या गुजरात राज्यात देखील मोठ्या प्रमाणावर भाजीपाला नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातून जात आहे.


Web Title – पाऊस सुरु झाल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा, शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत – Marathi News | Maharashtra farmer news tur Pulses rates incraesed agricultural news in marathi

हे वाचलंत का? -  आधी करत होता १२ हजारांची नोकरी, आता शेतीतून कमावतो एक कोटी - Marathi News | Farmer turned millionaire from shednet farming

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj