मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

Farmer News : संतापलेल्या शेतकऱ्याने दीड एकर मूग पिकावर फिरवला ट्रॅक्टर, कारण सांगितल्यानंतर… – Marathi News | Kharif season affected by changing climate

नाशिक : पावसाळ्याचा दोन महिन्याचा कालावधी उलटून गेला तरी देखील येवल्यासह नाशिक (NASHIK) जिल्ह्यातील ग्रामीण भागात समाधान कारक पाऊस अद्याप पाऊस झालेला नाही. पावसा अभावी पिकांची वाढ झाली नसल्याचं चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. हातातून पीक गेल्याचे पाहून येवला तालुक्यातील अंकाई येथील हवालदिल झालेल्या बाळासाहेब गोराणे (Balasaheb gorane) या शेतकऱ्याने दीड एकरावरील मूग पिकावर ट्रॅकटर फिरवला आहे. सध्या नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात कडक ऊन पडत असल्यामुळे त्याचा परिणाम खरीप हंगामातील (KHARIP SEASON) सगळ्याचं पिकांवर होऊ लागला असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

हे वाचलंत का? -  शेतकऱ्यांनो मोठी बातमी! पीएम किसान योजनेच्या हप्त्यात तब्बल इतक्या रुपयांची वाढ..

अज्ञाताकडून टोमॅटो पिकाचे नुकसान

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील सांगवी येथील शेतकरी महेश तळपाडे यांचे टोमॅटोचे पीक अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या अंधारात उपटून टाकल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 20 गुंठ्यात असलेलं टोमॅटोचं पीक तोडणीला आलं होतं. त्याचं नुकसान करण्यात आलं आहे. टोमॅटो पिकाला बाजारात चांगला भाव मिळत आहे. काल रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्तीने टोमॅटो उपटून टाकल्याने त्यांचे 3 ते चार लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.

हे सुद्धा वाचा



ऑगस्ट महिना सुरु झाल्यापासून महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यातून पाऊस गायब झाला आहे. पुणे जिल्ह्यात सुध्दा काही भागात पाऊस पूर्णपणे गायब झाला आहे. कडक उन्हामुळं शेतात असलेलं पीक पिवळ पडू लागलं आहे. त्यामुळं येत्या काही दिवसात पाऊस नाही पडला तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावणार असल्याची चिंता शेतकरी व्यक्त करीत आहेत. अशी परिस्थिती आली तर शासनाकडून शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी मोफत बी बियाणे उपलब्ध करून देण्यात यावीत अशी मागणी पुण्यातील ठाकरे गटाने केली आहे. तसे निवेदन सुध्दा ठाकरे गटाकडून पुणे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

हे वाचलंत का? -  वाशिम जिल्ह्यात पाऊस नसल्यामुळे शेतकरी चिंतेत, गेल्यावर्षीच्या तुलनेत खूपच कमी पाऊस - Marathi News | Farmers worried due to lack of rain in Washim district, much less rain compared to last year


Web Title – Farmer News : संतापलेल्या शेतकऱ्याने दीड एकर मूग पिकावर फिरवला ट्रॅक्टर, कारण सांगितल्यानंतर… – Marathi News | Kharif season affected by changing climate

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj