मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

बाजार समित्या बंद, कोट्यवधींची उलाढाल ठप्प, काय आहे विषय – Marathi News | Krushi utpanna bazar off in Nashik district stopped crores turnover marathi news

लासलगावमधील बाजार समितीत लिलावासाठी आलेला कांदा

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नाशिक जिल्ह्यातील 15 प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील कांदा व शेतमाल लिलाव बंद झाला आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. बाजार समित्यांमध्ये आणलेला शेतमाल विक्री होत नाही. गेल्या आठ दिवसांपासून हा प्रकार सुरु आहे. माथाडी कामगारांनी हमाली, तोलाई आणि वाराई कपात करू नये या प्रश्नी बंद सुरु आहे. यामुळे 125 हून अधिक कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. बंदीमुळे शेतकरी अडचणीत आला असताना बंद मागे न घेतल्यास देशात कांद्याची टंचाई निर्माण होणार आहे. त्याचा ग्राहकांना बसणार आहे.

हे वाचलंत का? -  Agriculture Budget 2024 : विषमुक्त शेतीला प्राधान्य, नैसर्गिक शेतीसाठी काय योजना, शेतकऱ्यांसाठी बजेट काय केल्या घोषणा - Marathi News | Agriculture Budget 2024 Experiment of toxic free agriculture in the budget; Empowering 1 crore farmers, Nirmala Sitharaman's preference for natural farming, what was announced

काय आहे विषय

कृषी उत्पन्न बाजार समितींमध्ये शेतकरी वर्गाच्या हिशोब पट्टीतून हमाली, तोलाई, वराई कपाती संदर्भात निर्णय होत नाही. 2008 पूर्वी हमाली, तोलाई, वाराई ही रक्कम लेव्हीसह शेतकऱ्यांकडून कपात केली जात होती. 2008 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शेतकऱ्यांच्या हिशोब पावतीतून रक्कम कपात करावी, असा निर्णय दिला. परंतु लेव्ही रक्कम कोणी अदा करावी याबाबत निर्णय दिला नव्हता. महाराष्ट्र शासनाने खरेदी दाराकडून वसूल करावी असा निर्णय दिला होता.

शासनाच्या निर्णयास विरोध

लेव्हीची रक्कम खरेदीदाराकडून वसूल करण्यास नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमधील व्यापारी असोसिएशने विरोध केला. त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर निर्णय देताना न्यायालयाने हमाली, तोलाई, वराई कामकाज करणाऱ्या माथाडी कामगारांचे मालक कोण? याचा निर्णय जिल्हा न्यायालयात घ्यावा असा निर्णय दिला. त्यानंतर निफाड वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाने 20/09/2023 रोजी दिलेल्या आदेशाप्रमाणे माथाडी बोर्डाने नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्याकडे थकीत असलेली लेव्ही व दंडात्मक रक्कम वसुली संदर्भात नोटिसा दिल्या. त्यानुसार व्यापारी वर्गाने असा निर्णय घेतला की 1 एप्रिल 2024 पासून हमाली, तोलई, वाराही रक्कम शेतकऱ्यांच्या हिशोब पावतीतून कपात न करण्याचा निर्णय घेतला.

हे वाचलंत का? -  Business idea : लाल भेंडीने बंपर कमाई, एक एकर शेतीतून २५ लाखांचे उत्पादन - Marathi News | Earning up to Rs. 25 lakh per acre from red okra production

हे सुद्धा वाचा

अखेर सुरु झाला बंद

माथाडी-मापारी कामगारांच्या हमाली, तोलाई व वाराई कपातीसह लेव्ही संदर्भात सर्वमान्य तोडगा निघेपावेतो बंद पुकारला. 04 एप्रिलपासून हा बंद सुरु आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या बंद आहेत.


Web Title – बाजार समित्या बंद, कोट्यवधींची उलाढाल ठप्प, काय आहे विषय – Marathi News | Krushi utpanna bazar off in Nashik district stopped crores turnover marathi news

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj