मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

काही तोडगा निघतोय का ? याकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नजरा – Marathi News | Centre Gives Assurance As Asia’s Largest Onion Market Shut For Second Day

महाराष्ट्र : अहमदनगर (Ahmadnagar) जिल्ह्यातील राहुरी आणि श्रीरामपूर बाजार समितीत आज कांदा लिलाव बंद ठेवत व्यापा-यांनीही शेतक-यांच्या आंदोलनाला (protests against export duty) पाठींबा दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलन केले जात असून केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात शेतकरी आक्रमक होताना दिसत आहेत. महाराष्टात (Centre Gives Assurance As Asia’s Largest Onion Market Shut For Second Day) अनेक शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला अजून कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.

कांदा रस्त्यावर फेकून सरकार विरोधात घोषणाबाजी

नाशिकच्या निफाड तालुक्यातील रुई गावात शेतकरी संघटनांच्या वतीने सरकारच्या कांदा निर्यात शुल्क वाढवण्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन करण्यात आलं होतं. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी आपला कांदा रस्त्यावर फेकून सरकार विरोधात घोषणाबाजी केली. दरम्यान सरकारने हा निर्णय तातडीने मागे न घेतल्यास येणाऱ्या काळात आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला.

हे वाचलंत का? -  खुशखबर! लाडक्या बहिणींना दिवाळीचे गिफ्ट; या तारखेला मिळणार 3000 रुपये, पहा नवीन तारीख..!

कांदा निर्यातीवर 40 टक्के निर्यात शुल्क

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 40 टक्के निर्यात शुल्क आकारण्याचा निर्णया विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पारनेर तालुक्यातील निघोज येथे शेतकरी आणि शरद पवार गटाच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होणार आहेत. काल देखील नगरच्या नेप्ती कांदा मार्केट येथे जीआरची होळी करून शासनाचा निषेध नोंदवला आहे.

हे सुद्धा वाचा



निर्यात शुल्क वाढीचे आज दुसऱ्या दिवशीही पडसाद

नाशिक जिल्ह्यात लासलगाव मध्ये आज निर्यात शुल्क वाढीचे आज दुसऱ्या दिवशीही पडसाद पाहायला मिळाले. लासलगावसह जिल्ह्यातील प्रमुख 15 बाजार समित्यांमध्ये कांदा लिलावाचे कामकाज कडकडीत बंद पाळण्यात आले. दुसऱ्या दिवशीही कांदा लिलाव बंदमुळे 60 ते 70 कोटींची उलाढाल ठप्प आहे. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11 वाजता कांदा लिलाव सुरू करण्यासाठी व्यापाऱ्यांशी बैठक झाली.

हे वाचलंत का? -  पीएम किसान लाभार्थी यादीतून या शेतकऱ्यांना वगळले.. बघा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ..


Web Title – काही तोडगा निघतोय का ? याकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नजरा – Marathi News | Centre Gives Assurance As Asia’s Largest Onion Market Shut For Second Day

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj