मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

MS Dhoni | धोनी चालवतो त्या ट्रॅक्टरची किंमत किती? शेतकऱ्याचा काम होतं सोपं – Marathi News | Ms dhoni drive swaraj 855 fe tractor How much it will cost price know features details about it

नवी दिल्ली : Swaraj Tractors एक असं नाव आहे, ज्याला कुठल्या ओळखीची गरज नाही. नव्या आणि अत्याधुनिक फिचर्ससह येणारा हा ट्रॅक्टर शेतात शेतकऱ्यांच काम सोपं करतो. भारतीय बाजारपेठेत स्वराज ट्रॅक्टर्सचे 30 पेक्षा जास्त मॉडल्स आहेत. यापैकी कोणत्या मॉडलचा ट्रॅक्टर धोनी चालवतो हे तुम्हाला माहितीय का?. Mahendra Singh Dhoni स्वराजचा Swaraj 855 FE ट्रॅक्टर चालवताना दिसला होता. या ट्रॅक्टरची खास गोष्ट म्हणजे त्याला 6 वर्षांचा वॉरंटी पिरीयड आहे. हा ट्रॅक्टर कंटेम्परेरी स्टाइल आणि एडवान्स फिचर्सचा कॉम्बो आहे. हा ट्रॅक्टर पावर आणि परफॉर्मन्समध्ये बेस्ट आहे. शेतीशी संबंधित सर्व टास्क सहजतेने हँडल करतो. काही काळापूर्वी महिंद्रा ग्रुपने आपल्या यूट्यूब चॅनलवर या ट्रॅक्टरचा व्हिडिओ शेअर केला.

या ट्रॅक्टरमध्ये 3 सिलेंडर आहेत. त्याशिवाय हा ट्रॅक्टर 29.82-37.28 kW वर 41-50 HP पावर जनरेट करतो. या ट्रॅक्टरमध्ये कंपनीने 2000 रेटेड पॉवरफुल इंजिनचा वापर केलाय. भक्कमपणा लक्षात घेऊन ट्रॅक्टरच्या फ्रंटमध्ये मजबूत Axle येतं. चांगल्या विजिबिलिटीसाठी मजबूत फेंडरसह LED लाइट आहेत. या ट्रॅक्टरमध्ये एकाचवेळी 62 लीटर डिझेल भरता येतं.

हे वाचलंत का? -  आता पीकं होणार नाही खराब, असे वाढेल शेतकऱ्याचे उत्पन्न; सरकार मोफत देणार सहा लाख - Marathi News | The state government will provide subsidy so that the fruit crops are not spoiled

धोनी चालवतो त्या ट्रॅक्टरची किंमत किती?

स्वराजचा हा ट्रॅक्टर तुम्हाला 6 वर्षांच्या स्टँडर्ड वॉरंटीसह मिळेल. या ट्रॅक्टरची किंमत कीमत 6.9 लाख (एक्स-शोरूम) ते 9.95 लाख (एक्स-शोरूम) पर्यंत आहे. स्वराज ट्रॅक्टरने ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून लोकप्रिय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीची निवड केलीय.


Web Title – MS Dhoni | धोनी चालवतो त्या ट्रॅक्टरची किंमत किती? शेतकऱ्याचा काम होतं सोपं – Marathi News | Ms dhoni drive swaraj 855 fe tractor How much it will cost price know features details about it

हे वाचलंत का? -  पुढचे काही दिवस मुसळधार पावसाचे, कोकणासह या 11 राज्यांना अतिवृष्टीचा इशारा - Marathi News | Heavy rain for next few days heavy rain warning for these 11 states including konkan

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj