मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

monsoon | मॉन्सूनचा फटका खरीप हंगामास, कमी पावसामुळे शेतमालाच्या उत्पादनावर परिणाम, काय आहे अंदाज – Marathi News | Monsoon short in Maharashtra, Kharif season production will decrease this year

पुणे | 10 ऑक्टोंबर 2023 : भारतीय हवामान विभागाने जाहीर केलेला अंदाज यावर्षी फोल ठरला. देशातील अनेक राज्यात पावसाने सरासरी गाठली नाही. महाराष्ट्रात यंदा पावसाची तूट राहिली. राज्यातील ३६ पैकी २४ जिल्ह्यांत यंदा कमी पाऊस झाला आहे. हवामान विभागाने मॉन्सून संपल्याचे जाहीर केले आहे. तसेच महाराष्ट्रातून मॉन्सूनचा परतीचा पाऊस पूर्ण झाला आहे. राज्यातील धरणांमध्ये यंदा जलसाठा पूर्ण झालेला नाही. या सर्वांचा परिणाम यंदा शेतीवर होणार आहे. खरीप आणि रब्बी हंगामत उत्पन्न घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

खरीप हंगामासंदर्भात काय आहे अंदाज

राज्यातील शेतकऱ्यांना यंदा खरीप हंगाम चांगला येईल, अशी अपेक्षा होती. कारण हवामान विभागाने यंदा सरासरी पावसाचा अंदाज वर्तवला होता. परंतु जून आणि ऑगस्ट महिन्यात पावसाची तूट राहिली. यामुळे राज्यातील ३६ पैकी २४ जिल्ह्यांत अपेक्षित मोसमी पाऊस झाला नाही. त्याचा परिणाम शेतमालाच्या उत्पन्नावर होणार आहे. खरीप हंगमात उत्पादन मोठया प्रमाणात घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यांतील ८९० मंडलांत खरीप पिकांचे उत्पादन ५० टक्क्यांपेक्षा कमी राहणार असल्याने अंदाज आहे. यामुळे शेतीमालाच्या उत्पादनात मोठी तूट होण्याचा अंदाज आहे.

हे वाचलंत का? -  dasara 2023 | झेंडूच्या फुलांनी आणले शेतकऱ्यांसमोर संकट...काय आहेत दर - Marathi News | Marigold flower price Fall, Farmers in trouble marathi news

वर्षभर अन्नधान्य टंचाई जाणवणार

खरीप हंगामाचा परिणामामुळे आगामी वर्षभरात अन्नधान्याची टंचाई जाणवण्याची भीती आहे. राज्याच्या कृषी विभागाने मोसमी पावसाच्या हंगामात ३६ पैकी २४ जिल्ह्यांत अपेक्षित पाऊस झाला नसल्याचे म्हटले आहे. यामुळे पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नगर, नाशिक, नंदूरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, परभणी, धाराशिव, नांदेड, हिंगोली, अमरावती, बुलडाणा, अकोला, वाशिम, नागपूर, चंद्रपूर या जिल्ह्यातील उत्पादन घटणार आहे.

हे सुद्धा वाचा



रब्बी हंगामावर होणार परिणाम

खरीप हंगामाप्रमाणे यंदा रब्बी हंगामावर परिणाम होणार आहे. यंदा कमी पाऊस झाल्यामुळे राज्यातील धरणांमध्ये पुरेसा जलसाठा झालेला नाही. त्यामुळे पहिले प्राधान्य पिण्याच्या पाण्याच्या आरक्षणास राहणार आहे. त्यानंतर उपलब्ध पाण्यावर शेतीचे नियोजन करण्यात येणार आहे. यंदा रब्बीसाठी कमी आवर्तन मिळण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम रब्बी हंमामाच्या उत्पादनावर होणार आहे.

हे वाचलंत का? -  लाडकी बहीण योजनेनंतर सरकारची आणखी एक मोठी योजना, शेतकऱ्यांना मिळणार मोफत... - Marathi News | Free Electricity Scheme for Farmers by maharashtra government marathi news


Web Title – monsoon | मॉन्सूनचा फटका खरीप हंगामास, कमी पावसामुळे शेतमालाच्या उत्पादनावर परिणाम, काय आहे अंदाज – Marathi News | Monsoon short in Maharashtra, Kharif season production will decrease this year

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj