मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

सहनही होईना आणि सांगताही येईना, पूरग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत – Marathi News | Buldhana crop destroyed heavy rain update farmer news in marathi

गणेश सोळंकी, बुलढाणा : ढगफुटीमुळे पिकाचे नुकसान (Crop destroyed) झालेल्या शेतकऱ्यांना तसेच बेघर झालेल्यांना आर्थिक मदत द्या अशी मागणी आता शेतकरी करु लागले आहेत. पूरग्रस्त भागातील युवकांची मागणी मान्य न केल्यास त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. देशात जून महिन्यात पावसाने पाठ फिरवली होती. त्यानंतर जुलै महिन्यात मुसळधार पाऊस (heavy rain update) झाला. ज्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. तिथं पूरस्थिती निर्माण झाली होती. बुलढाणा (buldhana news in marathi) जिल्ह्यात सुध्दा मागच्या महिन्यात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यांना मदत मिळावी म्हणून युवकांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे.

हे वाचलंत का? -  Farmer News : संतापलेल्या शेतकऱ्याने दीड एकर मूग पिकावर फिरवला ट्रॅक्टर, कारण सांगितल्यानंतर... - Marathi News | Kharif season affected by changing climate

पूरग्रस्त भागातील युवकांनी सांगितली व्यथा

जुलै महिन्यात जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यात ढगफुटी सदृष्य स्थिती झाली होती. त्यामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरलं होतं. नदीकाठच्या घरांमध्ये पाणी प्यायला ग्लास सुद्धा राहिला नसल्याची खंत युवक सांगत आहेत. काही लोकांची दुकाने, जनावरे पूरातून वाहून गेल्याने खुप आर्थिक नुकसान झाल्याची माहिती तरुण सांगत आहेत.

बुलढाणा जिल्ह्यात शेतीचे ही मोठे नुकसान झाले आहे. शेतीचे अतोनात नुकसान झाले असून नदीकाठच्या जमिनी शेती पिकांसह खरडून गेल्या आहेत. भीषण स्थिती असताना सुध्दा सरकारने आतापर्यंत या नुकसान ग्रस्त भागातील लोकांना कसल्याची प्रकारची आर्थिक मदत केलेली नाही.

हे वाचलंत का? -  MBA पास युवकाचा कडकनाथ कोंबड्यांचा व्यवसाय, अशी करतो लाखो रुपयांची कमाई - Marathi News | An MBA pass youth earns lakhs of rupees from Kadaknath chicken farming

हे सुद्धा वाचासध्या काही भागातील शेतकऱ्यांनी, गरिबांनी जगावं की मरावं हा प्रश्न उपस्थित केला आहे. मागच्या महिन्यात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. २० दिवसांचा कालावधी उलटून सुद्धा आर्थिक मदत मिळत नसेल तर आम्ही लोकांनी पाहायचं कोणाकडे असा प्रश्न युवकांनी उपस्थित केला आहे. परिसरातील काही युवकांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे मागण्याचं पत्र दिलं आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.


Web Title – सहनही होईना आणि सांगताही येईना, पूरग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत – Marathi News | Buldhana crop destroyed heavy rain update farmer news in marathi

हे वाचलंत का? -  Farmer News Maharashtra : मिरचीचं पीक वाचवण्यासाठी शेतकरी पाजतोय बाटलीने पाणी - Marathi News | Farmer News Maharashtra agricultural news chilli crop destroyed rain update

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj