अमरावती : पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासाठी शासनाने पाचवेळा मुदत वाढ देऊनही जिल्ह्यातील 21 हजार 193 खातेदारांनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांची नावे बाद करण्यात आली आहेत. अशा शेतकऱ्यांना आता या योजनेच फायदा घेता येणार नाहीये. या शेतकऱ्यांची खाती बनावट समजली जाणार असून त्यांची नावे यादीतून काढून टाकण्यात आली आहेत.
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी 2,000 रुपयांचा लाभ दिला जातो. या योजनेचे 14 हप्ते आतापर्यंत वितरित करण्यात आले आहेत. या योजनेत अपात्र शेतकऱ्यांचाही समावेश असल्याने त्यांचे लाभ थांबवून त्यांच्याकडून पैसे वसूल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. याशिवाय या योजनेतील फसवणूक टाळण्यासाठी लाभार्थ्यांना आधार आणि ई-केवायसी लिंक करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
नेमकी काय आहे योजना?
प्रधानमंत्री किसान सन्मान योजना शेतकऱ्यांसाठी 1 डिसेंबर 2018 पासून सुरू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना तीन तीन हप्त्यांमध्ये 6,000 केंद्र सरकारकडून पैसे मिळतात. या योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची ओळख पटवून देण्याचं कन राज्य सरकारकडे सोपवलं आहे. केंद्रातून हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतात. शेतकऱ्याच्या नावानर जमीन असणं गरजेचं आहे. कारण त्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत.
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा पुढचा हप्ता कधी?
योजनेचा पुढचा येणारा हप्ता नोव्हेंबर किंवा डिसेंबरदरम्यान येऊ शकतो. याबाबत सरकारकडून कोणतीही अधिकृतोसी घोषणा केलेली नाही. याआधीचा हप्ता 27 जुलैला 14 वा हप्ता दिला होता. आता दिवाळीवेळी सरकारकडून 15 वा हप्ता येई शकतो.
Web Title – पीएम किसान योजनेतून महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यातील 21 हजार शेतकऱ्यांची नावं बाद, पाहा तुमचं नाव आहे का? – Marathi News | PM Kisan Yojana 21 thosand Farmers Name rejected due to update KYC latest marathi News