मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

निरक्षर शेतकऱ्याचा व्यापाऱ्यांना धक्का, असे मिळवले ८० लाखांचे उत्पन्न – Marathi News | The farmer earned 80 lakh rupees from pomegranate cultivation

नवी दिल्ली : बहुतेक लोकं म्हणतात शेती तोड्यात आहे. खर्चाच्या मानाने उत्पन्न निघत नाही. बहुतेक वेळा भाव मिळत नसल्याने फायदा होत नाही. परंतु, योग्य पद्धतीने शेती केल्यास जमिनीतून सोना उगवतो. यासाठी थोडा धीर धरावा लागतो. आता आपण पाहणार आहोत एका राजस्थानच्या शेतकऱ्याबाबत. त्यांनी शेतीतून लाखो रुपयांची कमाई सुरू केली आहे. बाडमेर जिल्ह्यातील भईमडा येथील जेठाराम कोडेचा यांची ही गोष्ट. आधी ते पारंपरिक शेती करत होते. परंतु, त्यांना पाहिजे तसा नफा मिळत नव्हता. त्यानंतर त्यांनी शेती करण्याची पद्धती बदलवली. शेतात फळबाग लावली. २०१६ पासून ते डाळिंबाची शेती करत आहेत. यातून त्यांचे भविष्य बदलले. डाळिंबाची विक्री ते महाराष्ट्र, कोलकाता आणि बांग्लादेशात करतात.

हे वाचलंत का? -  कर्टुला लागवडीतून शेतकरी झाला मालामाल, तीन महिन्यांत ९ लाखांचे उत्पन्न - Marathi News | Nanded farmer earns lakhs from curtula cultivation

दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न

२०१६ मध्ये जेठाराम यांनी १५ लाख रुपयांचे कर्ज घेऊन स्टार्टअप म्हणून डाळिंबाची लागवड केली. यासाठी त्यांनी नाशिकमधील ४ हजार रोपं मागवली. यानंतर कोडेचा यांनी मागे फिरून पाहिले नाही.

असे मिळते उत्पन्न

विशेष म्हणजे जेठाराम कोडेचा हे शिकलेले नाहीत. निरक्षर शेतकरी आहेत. परंतु, मोठ-मोठ्या व्यवसायिकांना त्यांनी मागे टाकले. भगवा आणि सेंद्री रंगाचे डाळिंब त्यांनी शेतात लावले. एका रोपापासून सुमारे २५ किलो डाळिंब त्यांना मिळतात. डाळिंब लागवड केल्यानंतर एका वर्षाने त्यांना उत्पन्न मिळणे सुरू झाले. डाळिंब विक्रीतून दुसऱ्या वर्षी त्यांना सात लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. तिसऱ्या वर्षी १५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. चौथ्या वर्षी त्यांना २५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. तर पाचव्या वर्षी त्यांना ३५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. गेल्या पाच वर्षांत त्यांनी सुमारे ८० लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.

हे वाचलंत का? -  सरकारकडून मिळाली नाही मदत, कर्ज घेऊन सुरू केली फळबाग, आता असे वाढले उत्पन्न - Marathi News | Increased income of the farmer through modern orchard cultivation

शेतीची योग्य मशागत करावी. खत व्यवस्थापन करून कीड नियंत्रित ठेवावी. यातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते. फळबाग आणि भाजीपाला पिकातून उत्पन्नात वाढ होते. परंतु, त्यासाठी पिकांची योग्य काळजी घ्यावी लागते. पारंपरिक पीक पद्धतीत उत्पन्नाची हमी असते. पण, फारच कमी प्रमाणात फायदा होतो. फळबाग आणि भाजीपाला लागवडीमध्ये धोका असतो. पण, तो धोका पत्करल्यास त्याचा मोबदलाही तसा मिळतो.


Web Title – निरक्षर शेतकऱ्याचा व्यापाऱ्यांना धक्का, असे मिळवले ८० लाखांचे उत्पन्न – Marathi News | The farmer earned 80 lakh rupees from pomegranate cultivation

हे वाचलंत का? -  PM Kisan : नाही मिळाला पीएम किसानचा 17 वा हप्ता? मग अशी करा की ऑनलाईन तक्रार - Marathi News | 17th installment of PM Kisan Yojana not received? Then do online complaint

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj