मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

इंदापूरमध्ये लाईट शिवाय मोटार चालते, शेतकऱ्यांचा जुगाड पाहायला लोकांची गर्दी – Marathi News | Pune indapur farmer jugaad video viral on social media agricultural news in marathi

मुंबई : सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर (social media) व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ शेतीशी (farmer news) संबंधित असल्यामुळे अधिक व्हायरल झाला आहे. शेतीची (Agricultural news in marathi) कामं हलकी करण्यासाठी अनेक शेतकरी आपल्या पद्धतीने जुगाड करतात. तसे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. शेतकऱ्यांची काम सोपी व्हावीत किंवा कमी वेळेत व्हावीत यासाठी शेतकरी अधिक धडपड करीत असतो. काही शेतकऱ्यांनी अशा गोष्टी तयार केल्या आहेत की, लोक त्यांच्याकडं त्या गोष्टी पाहायला जातात.खरतर लोकांना शेतकऱ्यांनी केलेला जुगाड अधिक आवडतो.

व्हिडीओमध्ये काय आहे

व्हिडीओ इन्स्टाग्रामवरती व्हायरल झालेला आहे. त्यामध्ये शेतकरी पॅटर्न, आम्ही इंदापूरकर लाईट शिवाय मोटार चालू एक नवा प्रयत्न असं लिहीलं आहे. एक तरुण तिथं ठेवलेलं इंजिन हाताने सुरु करीत आहे. लाईट शिवाय त्यांनी जुगाड करुन मोटार सुरु होत असल्याचं व्हिडीओत दाखवलं आहे. व्हिडीओ एक मोटार, एक बॅटरी असं साहित्य सुरुवातीला दिसत आहे. एकदा मोटार सुरु झाल्यानंतर मोटारमधून पाणी सुरु झालं आहे. त्यावेळी तिथं असलेल्या बोर्डमध्ये पटकन लाईट लागल्या आहे. मशीनच्या बाजूला एक मोठा बोर्ड ठेवण्यात आला आहे. त्याला १५ बल्ब आहेत. ते सगळे सुरु झाले आहेत.

हे वाचलंत का? -  LPG गॅस ग्राहकांसाठी मोठी बातमी, सिलिंडर दराबाबत केंद्रीय मंत्र्यांची मोठी घोषणा…

हे सुद्धा वाचा



पाणी थेट एका मशिनवरती पाडलं आहे

जे पाणी मोटारमधून बाहेर आलं आहे. ते पाणी थेट एका मशिनवरती पाडलं आहे. त्यामुळे पुढशी मशीन गतीने गोल फिरत आहे. खाली पडलेलं सगळं बाजूच्या शेतात जात आहे. स्पीडचं पाणी लाईट तयार करीत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओला एक मराठी गाणं लावण्यात आलं आहे. त्याचबरोबर जुगाड करण्यासाठी काय काय साहित्य वापरलं आहे हे सुध्दा व्हिडीओत दाखवण्यातं आलं आहे.



Web Title – इंदापूरमध्ये लाईट शिवाय मोटार चालते, शेतकऱ्यांचा जुगाड पाहायला लोकांची गर्दी – Marathi News | Pune indapur farmer jugaad video viral on social media agricultural news in marathi

हे वाचलंत का? -  मुगाचे प्रति क्विंटल दर 15 हजारांचा टप्पा लवकरचं पार करण्याची शक्यता - Marathi News | A record price of Rs 13 thousand 501 per quintal for Mugla

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj