मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

मुगाचे प्रति क्विंटल दर 15 हजारांचा टप्पा लवकरचं पार करण्याची शक्यता – Marathi News | A record price of Rs 13 thousand 501 per quintal for Mugla

महाराष्ट्र : महिनाभरापूर्वी दोनशे रुपये किलो दराने विक्री होणाऱ्या टोमॅटोचे दर (tomato rate) पडले असून, टोमॅटो आता बाजार समितीत (tomato market samiti) दोन ते तीन रुपये प्रति किलोने शेतकऱ्यांकडून खरेदी केला जात असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत आलेला आहे. टोमॅटोच्या परत कॅरेट रेट दोनशे ते तीनशे रुपयांपर्यंत जात असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. टमाट्याचे दर असेच पडत राहिले, तर शेतकऱ्यांचा लागवड खर्चही निघणार नसल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जातं आहे. एकीकडे टोमॅटोचे दर वाढले तर सरकारकडून नेपाळ आणि इतर भागातून टोमॅटो आयात केले जातात, मात्र दर पडल्यावर शेतकऱ्याला (farmer news in marathi) हामी भाव का दिला जात नाही असा प्रश्न आता टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

वाशिम जिल्ह्यातील कारंजा व वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नव्या मुगाला विक्रमी 13 हजार 501 रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाले आहेत. मुगाच्या दरातील ही तेजी या पुढेही कायम राहणार असल्याने मुगाचे प्रति क्विंटल दर 15 हजारांचा टप्पा लवकरच पार करणार असल्याचे बाजार समितीच्या अभ्यासकांनी सांगितले आहे. यंदा मान्सून लांबल्याने वाशिम जिल्ह्यात मुगाच्या क्षेत्रात खूप मोठी घट झाली असून, यंदा वाशिम जिल्ह्यात केवळ 440 हेक्टर क्षेत्रावर मुगाची पेरणी झाली आहे.

हे वाचलंत का? -  Farmer News Maharashtra : मिरचीचं पीक वाचवण्यासाठी शेतकरी पाजतोय बाटलीने पाणी - Marathi News | Farmer News Maharashtra agricultural news chilli crop destroyed rain update

दोन एकरातला ऊस जळाला

सोलापूरच्या माढ्यातील कव्हे गावातील भारत ज्योतीराम करंडे या शेतकऱ्याचा २ एकर ऊस महावितरणच्या विद्युत तारा पडल्याने जळुन खाक झाला आहे. विद्युत तारा ऊसावरच पडल्याने शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झाले असून महावितरणने पंचनामा करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करंडे यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा



हे वाचलंत का? -  RBI चं शेतकर्‍यांना मोठं गिफ्ट; विना तारण दोन लाखांचं कर्ज मिळणार - Marathi News | Guarantee Free Agri Loan Limit RBI's big gift to farmers; You will get a loan of two lakhs without collateral

24 हजार 579 क्यूसेक पाण्याचा विसर्ग…

गेल्या दीड महिन्यापासून दडी मारून बसलेल्या पावसाची गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक आणि निफाड तालुक्यांमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. दारणा, गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असून तसेच उपनद्यातून पूर पाणी निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर धरणाच्या पानलोट क्षेत्रामध्ये येत असल्याने धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढ होत असल्याने नांदूर मधमेश्वर धरणाच्या सहा वक्राकार गेटमधून मराठवाड्याच्या दिशेने गोदावरी नदी पात्रात 24 हजार 579 क्यूसेक पाण्याचा जायकवाडीच्या दिशेने विसर्ग सुरु असल्याने दुष्काळग्रस्त मराठवाड्याला मोठा दिलासा मिळणार आहे.

हे वाचलंत का? -  काय सांगता? सोयाबीन बाजारभाव तब्बल एवढ्या रुपयांनी वाढला.. बघा आजचा बाजार भाव..


Web Title – मुगाचे प्रति क्विंटल दर 15 हजारांचा टप्पा लवकरचं पार करण्याची शक्यता – Marathi News | A record price of Rs 13 thousand 501 per quintal for Mugla

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj