मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

महागाईला लसणाची फोडणी, गेल्यावर्षीपेक्षा भाव आता दुप्पट, ग्राहकांच्या खिशाला बसणार झळ – Marathi News | On the eve of monsoon, the price of garlic has doubled compared to last year, which has hit the pockets of consumers

गेल्यावर्षीच्या अखेरीस लसणाने दरवाढीत मोठी झेप घेतली होती. टोमॅटो, कांदा आणि बटाट्यांनी गेले वर्ष गाजवले होते. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये तर दरवाढीचा भडका उडाला होता. त्यानंतर लसणाने मोठी घौडदौड केल्याने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळवले होते. आता पावसाळ्याच्या तोंडावर लसणाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. महागाईला लसणाची फोडणी बसली आहे. नवी मुंबईतील बाजार समितीमध्ये 85 ते 210 रुपये किलो भाव आहे. गेल्या वर्षअखेरीस लसूणच्या दरवाढीचा विक्रम झाला होता. यावर्षीही हंगामाच्या सुरुवातीपासूनच दर वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.

गेल्यावर्षीपेक्षा भाव दुप्पट

गतवर्षी जूनच्या सुरुवातीला बाजार समितीमध्ये लसूण ४० ते ६५ रुपये किलो दराने विकला जात होता. यावर्षी हेच दर 85 ते 210 रूपयांवर पोहचले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये २८० ते ३०० रुपये किलो दराने लसूणची विक्री होत आहे. प्रत्येक वर्षी जानेवारीमध्ये लसूणचा हंगाम सुरू होतो. जूनपर्यंत लसणाचे दर घसरत असतात. परंतु यावर्षी हंगामाच्या सुरूवातीपासूनच लसूण तेजीत आहे. राज्यातील सर्वच बाजार समितीमध्ये ८० ते २३० रुपये किलोपर्यंत दर आहे. मुंबई बाजार समितीमध्येही गतवर्षीच्या जून महिन्यापेक्षा बाजारभाव दुप्पट झाले आहेत.

हे वाचलंत का? -  हे आहे 'पॅशन' फळ, पुण्यातील शेतकऱ्याने निवडली वेगळी वाट, केली लाखोंची कमाई - Marathi News | Farmer from Pune Indapur earned lakhs of rupees from passion fruit marathi news

हे सुद्धा वाचा

लसणाच्या दरवाढीचे कारण काय

लसूणचे उत्पादन कमी झाले असल्यामुळे हा फरक पडला आहे. दिवाळीदरम्यान काही प्रमाणात दर कमी होतील असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यातच आता इतर भाजीपाला महागल्यास ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री लागू शकते. केंद्र सरकारला याविषयी लवकर पाऊलं टाकावी लागणार आहे. देशात महागाईचा आलेख चढाच राहिला आहे. केंद्र सरकारने वेळोवेळी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. पण लहरी हवामानाने सरकारच्या प्रयत्नांवर पाणी फेरले आहे.

डिसेंबरमध्ये 400 रुपयांचा भाव

डिसेंबर 2023 मध्ये लसणाने मोठा भाव खाल्ला होता. प्रतिकूल हवामान आणि अवकाळी पावसाचा मोठा फटका त्यावेळी बसला होता. दिवाळीनंतर लसणाचा भाव 200-250 किलोच्या घरात होता. डिसेंबर महिन्यात हा भाव 350-400 रुपये किलोंच्या घरात पोहचला होता. त्यानंतर या जानेवारीत आवक वाढल्यानंतर या किंमती कमी झाल्या होत्या. आता पावसाळ्याच्या तोंडावर पुन्हा एकदा किंमतींनी हिसका दाखवला आहे.

हे वाचलंत का? -  Budget 2024 : आनंदाला नाही तोटा, अर्थसंकल्प आहे मोठा, शेतकऱ्यांसह करदात्यांना मिळणार दिलासा, पूर्ण होतील या चार मोठ्या अपेक्षा? - Marathi News | Modi 3.0 Budget 2024 No loss to happiness, relief to farmers and taxpayers, will these four big expectations be fulfilled


Web Title – महागाईला लसणाची फोडणी, गेल्यावर्षीपेक्षा भाव आता दुप्पट, ग्राहकांच्या खिशाला बसणार झळ – Marathi News | On the eve of monsoon, the price of garlic has doubled compared to last year, which has hit the pockets of consumers

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj