मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

कोण म्हणतं शेतीत उत्पन्न नाही?; स्ट्रॉबेरीतून लाखोंचं उत्पन्न मिळवणाऱ्या उच्च शिक्षित तरूणाची सक्सेस स्टोरी वाचा… – Marathi News | Nanded News Barad Balaji Upwar Famer Success story Strawberry farming Latest Marathi News

यशपाल भोसले, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, नांदेड | 09 जानेवारी 2024 : शेती व्यावसाय परवडत नाही. शेतीमध्ये उत्पन्न नाही. शेतीत जास्त गुंतवणूक करावी लागते. पण गुंतवणुकीच्या तुलनेत परतावा मिळत नाही, अशी ओरड आपण नेहमी ऐकतो. पण आज आम्ही तुम्हाला एक अशी सक्सेस स्टोरी सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला प्रेरणा मिळेल आणि तुमचीही पावलं शेती व्यावसायाकडे वळतील… ही कहानी एका उच्च शिक्षित तरूण शेतकऱ्याची. नांदेडमधील बारड गावचा बालाजी उपवार यांने उच्च शिक्षण घेतलं. बी.ए झाल्यानंतर त्याने शेतीची वाट धरली. 10 गुंठ्यात स्ट्रॉबेरीची लागवड केली अन् आज त्याला लाखोंचं उत्पन्न मिळू शकतं.

काळाप्रमाणे शेतीत देखील अनेक बदल होताना आपल्याला दिसून येतात . तसेच शेतकरी वर्षानुवर्ष पारंपारिक शेतीत अडकलेला देखील आपण पाहत होतो. मात्र, जसा काळ बदलला तशी शेतीची करण्याची पद्धत देखील बदलत चाललेली आहे. शेतीत अनेक वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. त्यात नांदेडच्या बारड येथील एका सुशिक्षित शेतक-याने पारंपारिक शेतीला बगल देत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्ट्रॉबेरीचा नवीन प्रयोग केलाय . 10 गुंठ्यांमध्ये त्यांनी हा प्रयोग केला आहे.

हे वाचलंत का? -  चक्क आता कांद्याची तस्करी, बॉक्स डाळिंब अन् टोमॅटोचा, परंतु आतामध्ये कांदा, Video व्हायरल - Marathi News | Onion smuggling from Nashik, Nagpur city marathi news

बारड इथं राहणारा बालाजी मारोती उपवार हा एक अल्पभूधारक प्रयोगशील शेतकरी आहे. त्यांचं शिक्षण बी.ए ग्रॅज्युएशन झाले आहे. हा तरूण शेतकरी आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करत असतो. बालाजी उपवार यांनी यंदाच्या वर्षी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दहा गुंठे क्षेत्रावर स्ट्रॉबेरी पिकाची लागवड केली आहे. त्यांनी हे स्ट्रॉबेरीची रोपं महाबळेश्वरवरून आणले होते. नाभिला जातीची ही स्ट्रॉबेरी असून 4000 कलमे त्यांनी आणली होती. या स्ट्रॉबेरीची लागवड करताना त्यांनी संपूर्ण सेंद्रीय पद्धतीचा वापर केला आहे. तसेच त्यांनी ठिबक आणि मलचिंग पेपरचा वापर करून या पिकाची लागवड केली आहे.

हे वाचलंत का? -  शेतकऱ्यांनो या तारखेला जमा होणार 18 वा हप्ता… इथे बघा लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या…

दोन ते अडीच महिन्यांच्या कालावधीतनंतर स्ट्रॉबेरी काढण्यास आली आहे. बालाजी यांनी थेट बाजारात ही स्ट्रॉबेरी न विकता त्यांनी ” शेतकरी ते ग्राहक” या तत्वाचा अवलंब करत थेट आपल्या शेतापुढेच व स्टाॅल लावुन व नांदेड शहरात अनेक भागात सोसायटीमध्ये जाऊन स्ट्रॉबेरीची विक्री करत आहेत. त्यामुळे थेट शेतकरी ते ग्राहक स्ट्रॉबेरीची विक्री केली जात आहे.

प्रतिकिलो 300 रुपये या प्रमाणे सध्या त्याची विक्री होत आहे. थेट शेतकऱ्यांकडून ताजा माल मिळत असल्याने ग्राहक देखील ते आवडीने घेताना पहायला मिळत आहेत.लागवड खर्च दीड लाख रूपये आला आहे. तर 30 किलो स्ट्रॉबेरीची रोज विक्री होत असून 5-6 लाख रूपये उत्पन्न मिळण्याची आशा बालाजी यांनी व्यक्त केली आहे.

हे वाचलंत का? -  Pulses | शेतकऱ्यांना डाळी ऑनलाईन विकता येणार, केंद्र सरकारने सुरु केले पोर्टल! - Marathi News | Forget the shortage of pulses, India will not import pulses from 2028, consumers can directly buy pulses from farmers on the government portal


Web Title – कोण म्हणतं शेतीत उत्पन्न नाही?; स्ट्रॉबेरीतून लाखोंचं उत्पन्न मिळवणाऱ्या उच्च शिक्षित तरूणाची सक्सेस स्टोरी वाचा… – Marathi News | Nanded News Barad Balaji Upwar Famer Success story Strawberry farming Latest Marathi News

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj