मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेचा मिळेल लाभ, लवकर करा हे काम – Marathi News | PM Kisan Samman Nidhi Yojana If you want the 15th installment of PM Kisan Yojana, then do it quickly, the process is easy

नवी दिल्ली | 10 ऑगस्ट 2023 : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत (PM Kisan Installment) शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे. वर्षभरात त्यांच्या खात्यावर 6000 रुपये जमा होत आहे. यापूर्वी या योजनेचा 14 वा हप्ता या 27 जुलै रोजी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला. देशातील 8 कोटींहून अधिक लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपयांचा हप्ता जमा झाला. DBT माध्यमातून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली. आता 15 व्या हप्ता (PM Kisan Scheme 15th Installment) मिळवायचा असेल तर शेतकऱ्यांना ही प्रक्रिया पार करावी लागेल. ज्यांनी अद्याप नोंदणी केली नाही. त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

योजनेला पाच वर्षे पूर्ण

हे वाचलंत का? -  TOMATO RATE TODAY : टोमॅटोचे दर घसरल्याने सामान्यांना दिलासा, जाणून घ्या आजचा दर - Marathi News | Vegetables Rate tomato rate down in market tur rate increased

केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना डिसेंबर 2018 मध्ये सुरु केली होती. त्यावेळी ही योजना अल्पभूधारक शेतकऱ्यांपुरती मर्यादीत होती. पण आता या योजनेचा विस्तार झाला आहे. सगळ्याच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो.

हे सुद्धा वाचा



रक्कम वाढू शकते

सध्या या योजनेत दरवर्षी जवळपास साडे आठ कोटी शेतकऱ्यांना निधी देण्यात येतो. वार्षिक 6000 रुपये देण्यात येतात. 2000 हजार रुपयांच्या तीन हप्त्यात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. या योजनेत एक हप्ता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात वार्षिक 8000 रुपये जमा होतील.

असा मिळतो लाभ

या योजनेतंर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना वर्षभरात 2000-2000-2000 रुपयांचे तीन हप्ते जमा होतात. एका वर्षात एकूण 6,000 रुपये जमा होतात. या योजनेतंर्गत पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै या दरम्यान देण्यात येतो. दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर या काळात देण्यात येतो. तर तिसरा हप्ता केंद्र सरकार 1 डिसेंबर ते 31 मार्च या दरम्यान हस्तांतरीत करण्यात आला. तुम्ही शेतकरी असाल तर आताच हा योजनेसाठी अर्ज करा.

हे वाचलंत का? -  MBA पास युवकाचा कडकनाथ कोंबड्यांचा व्यवसाय, अशी करतो लाखो रुपयांची कमाई - Marathi News | An MBA pass youth earns lakhs of rupees from Kadaknath chicken farming

पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी असा करा अर्ज

  1. pmkisan.gov.in या साईटवर जाऊन योजनेचा लाभ घेता येईल
  2. ‘किसान कॉर्नर’ पर्यायावर क्लिक करा
  3. ‘न्यू किसान रजिस्ट्रेशन’ हा पर्याय निवडा
  4. तुमचे शहर अथवा गावाची निवड करा
  5. आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, आणि राज्याची निवड करा
  6. ‘गेट ओटीपी’ वर क्लिक करा
  7. ओटीपी नोंदवून नोंदणीची पुढील प्रक्रिया करा
  8. नाव, राज्य, जिल्हा, बँक आणि आधारचा तपशील अशी सर्व माहिती भरा
  9. आधार प्रामाणिकरण करुन अर्ज जमा करा
  10. शेतीसंबंधीची माहिती जमा करा
  11. सेव्ह बटणावर क्लिक करा
  12. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्याचा मॅसेज येईल
हे वाचलंत का? -  भाजीपाला सोडून सुरू केली शिंगाडा शेती, आता दरवर्षी कमावतो १५ लाख रुपये - Marathi News | The farmer left vegetables and started Shingada farming


Web Title – PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेचा मिळेल लाभ, लवकर करा हे काम – Marathi News | PM Kisan Samman Nidhi Yojana If you want the 15th installment of PM Kisan Yojana, then do it quickly, the process is easy

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj