नवी दिल्ली : लोकांना वाटते की शेतकरी फक्त गहू, चण्याची शेती करतात. पण, तसं नाही शेतकरी नर्सरी तयार करत आहेत. यामुळे शेतकऱ्याचे उत्पन्न वाढत आहे. नर्सरी व्यवसायातून शेतकरी लखपती तसेच करोडपती होत आहेत. असाच एक शेतकरी ओम प्रकाश पाटीदार आहेत. शेतकरी ओमप्रकाश पाटील यांनी २०१३ मध्ये पहिल्यांदा शेडनेट हाऊस तयार केला. यासाठी त्यांना सरकारकडून मदत मिळाली. चार हजार वर्ग मीटरमध्ये शेडनेट हाऊस तयार केला. यासाठी त्यांना २८ लाख ४० हजार रुपये खर्च आला. सरकारकडून ५० टक्के अनुदान मिळाले.
ओमप्रकाश पाटीदार मध्य प्रदेशातील नांद्रा गावचे राहणारे. आधी ते १२ हजार रुपये महिन्याने खासगी नोकरी करत होते. परंतु, त्यात त्यांच्या घरचा खर्च भागत नव्हता. त्यामुळे त्यांनी भाजीपाला लागवड सुरू केली. आता ते पॉलीहाऊसमध्ये भाजीपाला काढतात. एका ऋतूत लाखो रुपयांचे उत्पन्न काढतात. विशेष म्हणजे ओमप्रकाश यांनी ४० जणांना रोजगार दिला आहे. त्यांच्या नर्सरीमध्ये ४० मजूर काम करतात.
साडेचार एकरमधील शेडनेट हाऊसमध्ये करतात शेती
ओमप्रकाश यांचे वडील पारंपरिक शेती करत होते. त्यात त्यांना फारसा फायदा मिळत नव्हता. परंतु, त्यांनी आता आधुनिक पद्धतीने नर्सरी सुरू केली. यामुळे त्यांचे उत्पन्न वाढले. सुरुवातीला त्यांनी २८ लाख ४० हजार रुपये खर्च करून चार हजार वर्ग मीटरमध्ये पॉलीहाऊस उभा केला. उत्पन्न वाढत गेले. त्यामुळे त्यांनी शेडनेटचे क्षेत्रफळ वाढवले. आता ते साडेचार एकर शेतीमध्ये शेडनेट हाऊसमधून उत्पन्न घेतात.
शेडनेट हाऊसमध्ये वर्षातून चार वेळा वेगवेगळ्या सीजनमध्ये वेगवेगळ्या भाजीपाल्याचे रोप तयार करतात. प्रत्येक ऋतूत रोपांची विक्री करून ओमप्रकाश २५ लाख रुपये कमवतात. वर्षभरात एक कोटी रुपयांची कमाई करतात. ओमप्रकाश आता नर्सरीत मिरची, पपई, टरबूज, टमाटर, वांगे, गोबी यांची रोपे तयार करतात. एका ऋतूत सुमारे २२ ते २५ लाख रोपं तयार करतात. आजूबाजूच्या परिसरात ते रोपांची विक्री करतात.
Web Title – आधी करत होता १२ हजारांची नोकरी, आता शेतीतून कमावतो एक कोटी – Marathi News | Farmer turned millionaire from shednet farming