मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

शेतकऱ्याने फिरवला वांग्याच्या शेतात ट्रॅक्टर, बाजारात भाव मिळच नसल्यामुळे शेतकरी संतापला – Marathi News | The farmer turned the tractor in the brinjal field, the farmer got angry because the price was not available in the market

महाराष्ट्र : बुलढाणा (buldhana) जिल्ह्यातील पेठ येथील शेतकरी दिलीप डुकरे (dilip dukare) यांनी त्यांच्या वांग्याच्या शेतावर ट्रॅक्टर फिरविला आहे. सध्या बाजारात वांग्याला भाव नसल्याने त्यांचे आर्थिक नुकसान झाले होते. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. पेठ येथील शेतकरी दिलीप डुकरे यांनी त्यांच्या अर्धा एकर शेतात वांगी लावली होती. यासाठी मोठा खर्च त्यांनी केला, सुरुवातीला बाजारात वांग्याला भाव मिळाला, मात्र आता वांग्याला बाजारात भाव नसल्याने मजुरांचे सुद्धा पैसे निघत नाहीत, त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याने त्यांनी आपल्या शेतातील (farmer news in marathi) वांग्यावर ट्रॅक्टर फिरविला असल्याचं सांगितले आहे.

बुलढाणा जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर

शेतकरी संघटनेचे प्रणेते स्वर्गीय शरद जोशी यांच्या जयंतीनिमित्त आज बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरात शेतकरी संघटनेने ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात काढला. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दासा पाटील यांच्या नेतृत्वात ट्रॅक्टर मोर्चा काढत कांद्यावरील निर्यात शुल्क कमी करा, बुलढाणा जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, जिल्हा बँकेची कारवाई थांबवा, इन्शुरन्स कंपनीकडून शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम द्यावी, सरकार सातत्याने शेतकऱ्यांना त्रास होईल असे निर्णय घेत असून शेतकऱ्यांसाठी सरकारने कांद्यावर लादलेले निर्यात शुल्क सुद्धा रद्द करावे, यासह विविध मागण्या लावून धरत शेतकरी संघटनेकडून ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. सरकारने या मागण्यांची तात्काळ दखल न घेतल्यास याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दासा पाटील यांनी दिला आहे.

हे वाचलंत का? -  MS Swaminathan | हरित क्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचे निधन - Marathi News | Father of Green Revolution Dr. M. S. Swaminathan passed away at the age of 98

वाशिम जिल्ह्यात 1 जुलैपासून ई-पीक पाहणी सुरु असून त्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र काही शेतकऱ्यांचे ई पीक पाहणी पुर्ण झाली, तर काहींची सर्व्हर डाऊन तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांना नोंदणी करणे शक्य न झाल्यामुळे मुदतवाढ मिळाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील जवळपास 50 टक्के शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केली असली तरी शेतकऱ्याकडे 10 दिवस उरले असून या शेतकऱ्यांनी मुदतीत पीक पेरा नोंदविणे आवश्यक आहे. मात्र अद्याप ही ई-पीक पाहणी सर्व्हर डाऊन असून शेतकऱ्यांना नाहक मानसिक त्रास सहन करण्याची वेळ येत आहे.

हे सुद्धा वाचाहे वाचलंत का? -  महाराष्ट्रात पाऊस गायब झाल्याने शेतकरी चिंतेत - Marathi News | All maharashtra farmer news in marathi nagpur sindhurg nashik amravati

परभणी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांमध्ये अनेक भागात किरकोळ स्वरूपाचा पाऊस झाला, झालेल्या पावसाने पिकांना काहीसा दिलासा मिळाला. मान टाकत असलेल्या सोयाबीन आणि कापूस या पिकांना पाण्यामुळे थोडासा आधार मिळाला खरा, मात्र अद्यापही शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे.


Web Title – शेतकऱ्याने फिरवला वांग्याच्या शेतात ट्रॅक्टर, बाजारात भाव मिळच नसल्यामुळे शेतकरी संतापला – Marathi News | The farmer turned the tractor in the brinjal field, the farmer got angry because the price was not available in the market

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj