मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

MBA पास युवकाचा कडकनाथ कोंबड्यांचा व्यवसाय, अशी करतो लाखो रुपयांची कमाई – Marathi News | An MBA pass youth earns lakhs of rupees from Kadaknath chicken farming

नवी दिल्ली, ८ सप्टेंबर २०२३ : बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की, कोंबडीपालन आणि मच्छीपालन या व्यवसायत फारशी कमाई नाही. परंतु, असं काही नाही. आता शिकलेले युवक कोंबड्या आणि मच्छीपालनाकडे वळत आहेत. यामुळे युवकांची कमाईसुद्धा वाढत आहे. ते आता चांगलं आयुष्य जगत आहेत. आता आपण अशा व्यक्तीविषयी पाहणार आहोत ज्यांनी एमबीएचं शिक्षण घेतलं. त्यानंतर चांगल्या कंपनीत नोकरी करण्याऐवजी कोंबडी पालन सुरू केले. आता ते या व्यवसायातून चांगली कमाई करत आहे. MBA उत्तीर्ण कुमार गौतम म्हणतात, गावात ८०० रुपये किलोने ते कडकनाथ कोंबड्या विक्री करतात. तर शहरात १ हजार रुपये किलोने कडकनाथ कोंबड्यांना मागणी आहे. ठिकाण बदलले की, कोंबड्यांचे भाव कमीजास्त होतात.

हे वाचलंत का? -  NSD कमांडोचे भविष्य शेतीने बदलले, असे काढतो २५ लाखांचे उत्पन्न - Marathi News | After retirement, the jawan held the hand of the earth

एमबीए पास झालेला युवक बिहारच्या परैयाबाजारचा रहिवासी आहे. कुमार गौतम यांनी बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमधून एमबीएचे शिक्षण घेतले. त्यानंतर ते सरकारी शाळेत शिकवू लागले. आता ते महमदप मध्य विद्यालयात शिक्षक आहेत. मुलांना शिकवता शिकवता त्यांनी कोंबडीपालन सुरू केले. शिवाय बटेर पालनही करत आहेत. त्यांनी आपल्या घरीच हा व्यवसाय सुरू केला. कोंबड्या आणि बटेरला दाणापाणी देतात. यासाठी त्यांनी वेगळे मजूर ठेवले नाहीत.

कडकनाथ कोंबड्यांचे पालन सुरू केले

कुमार गौतम म्हणतात, त्यांना कडकनाथ कोंबड्यांबद्दल काहीही माहिती नव्हती. परंतु, कडकनाथला जीआय टॅग मिळाल्यानंतर चर्चेत आला. त्यानंतर बाजारात कडकनाथची मागणी वाढली. त्यामुळे त्यांनी कडकनाथ कोंबड्यांचा व्यवसाय सुरू केला.

हे वाचलंत का? -  डाळिंब बाग वाचवण्यासाठी शेतकऱ्याची धडपड, त्याने केलेल्या युक्तीचे होते सर्वत्र कौतुक - Marathi News | Donation of clothing on pomegranate orchards to protect from heat

३५ ते ४० दिवसात कडकनाथ तयार

दिल्ली-मुंबईसारख्या महानगरात १८०० रुपये किलो कोंबड्याची मटन विकली जाते. कुमार गौतम यांनी मध्यप्रदेशातून ५५ रुपयाचा एक पिल्लू या हिशोबाने पिल्लू मागवले होते. विशेष म्हणजे कडकनाथ ३५ ते ४० दिवसात तयार होतो.

कोंबडी पालनातून चांगली कमाई

कडकनाथ कोंबड्यांशिवाय ते बटेर पालनही करतात. बटेरच्या अंड्यांसोबत मांसही विकतात. बटेरचा पिल्लू ४० ते ४५ दिवसांत तयार होतो. त्यानंतर बटेर विकता येतो. कडकनाथ कोंबड्या आणि बटेर पालनातून कुमार गौतम चांगली कमाई करत आहेत. वर्षाला लाखो रुपये कमावत आहेत. येणाऱ्या दिवसांत या व्यवसायाला मोठा करण्याचा कुमार यांचा प्लान आहे.

हे वाचलंत का? -  आता पीकं होणार नाही खराब, असे वाढेल शेतकऱ्याचे उत्पन्न; सरकार मोफत देणार सहा लाख - Marathi News | The state government will provide subsidy so that the fruit crops are not spoiled


Web Title – MBA पास युवकाचा कडकनाथ कोंबड्यांचा व्यवसाय, अशी करतो लाखो रुपयांची कमाई – Marathi News | An MBA pass youth earns lakhs of rupees from Kadaknath chicken farming

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj