तू दारू पितो का ? असं विधान करणाऱ्या मंत्र्यांची छगन भुजबळांनी घेतली फिरकी - NCP leader Chhagan Bhujbal criticized Abdul Sattar over the phrase Does he drink alcohol? - DigiShivar
मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

तू दारू पितो का ? असं विधान करणाऱ्या मंत्र्यांची छगन भुजबळांनी घेतली फिरकी – NCP leader Chhagan Bhujbal criticized Abdul Sattar over the phrase Does he drink alcohol?

अब्दुल सत्तार यांचा व्हायरल झालेला व्हिडिओ माजी मंत्री छगन भुजबळ यांना भाषणात आठवला, आणि त्यावरून त्यांनी सत्तार यांच्यावर फटकेबाजी केली.

तू दारू पितो का ? असं विधान करणाऱ्या मंत्र्यांची छगन भुजबळांनी घेतली फिरकी

Image Credit source: Social Media

नाशिक : गेल्या काही दिवसांपूर्वी राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यात अब्दुल सत्तार यांनी एका अधिकाऱ्याला दारू पितो का ? असं म्हंटल्याचे सांगत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी अब्दुल सत्तार यांची फिरकी घेतली आहे. नाशिकच्या निफाड तालुक्यातील रानवड येथील साखर कारखान्याच्या कार्यक्रमात बोलत असतांना छगन भुजबळ यांनी त्या व्हायरल व्हिडिओ संदर्भ देत अब्दुल सत्तार यांच्यावर टीका केली आहे. छगन भुजबळ यांनी त्यांच्या स्टाईलने राज्यासह केंद्राच्या कृषीमंत्र्यावर टीका केली आहे. त्यात अब्दुल सत्तार यांच्यावर बोलत असतांना छगन भुजबळ यांनी फटकेबाजी केली आहे.

कर्मवीर काकासाहेब वाघ साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या कार्यक्रमात भुजबळ बोलत असतांना कारखान्याच्या डिसलरीचा विषय त्यांनी काढला.

डिसलरीमध्ये दारू तयार होते का ? की मळी तयार होते असा प्रश्न भुजबळ यांनी आमदार दिलीप बनकर यांच्याकडे पाहून विचारला होता.

त्याचवेळी अब्दुल सत्तार यांचा व्हायरल झालेला व्हिडिओ माजी मंत्री छगन भुजबळ यांना आठवला, आणि त्यावरून त्यांनी सत्तार यांच्यावर फटकेबाजी केली.

यावेळी भुजबळ म्हणाले, मी आपले राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची एक क्लिप पहिली, त्यात ते त्या जिल्हाधिकाऱ्याला म्हणाले तू दारू पितो का ?

यावरूनच छगन भुजबळ यांनी फटकेबाजी करत अब्दुल सत्तार यांच्या विधानावर फटकेबाजी करत कृषीमंत्री कोण आहेत हेच माहिती नाही अशी टीका देखील केली.

यावेळी देशाचे कृषीमंत्री कोण हे देखील लोकांना माहिती नाही, आम्हाला तर पवार साहेबच कृषीमंत्री आहे असं वाटतं असं म्हणत केंद्रीय कृषीमंत्री यांच्यावर टीका करत असतांना भुजबळ यांची जीभ घसरली होती.


Web Title – तू दारू पितो का ? असं विधान करणाऱ्या मंत्र्यांची छगन भुजबळांनी घेतली फिरकी – NCP leader Chhagan Bhujbal criticized Abdul Sattar over the phrase Does he drink alcohol?

Leave a Comment

Share via
Copy link