द्राक्षाची गोडी लांबली... यंदाच्या वर्षी द्राक्ष बागायतदारांना असा बसणार मोठा फटका - grapes rain prolong the grape season farmers suffer due to grape export policies - DigiShivar
मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

द्राक्षाची गोडी लांबली… यंदाच्या वर्षी द्राक्ष बागायतदारांना असा बसणार मोठा फटका – grapes rain prolong the grape season farmers suffer due to grape export policies

यंदाच्यावर्षी पाऊस उशिरा पडल्याने आणि उघडल्याने द्राक्ष बागेच्या फळधारणेसह उत्पादनावर परिणाम होणार आहे.

द्राक्षाची गोडी लांबली... यंदाच्या वर्षी द्राक्ष बागायतदारांना असा बसणार मोठा फटका

Image Credit source: Google

नाशिक : द्राक्षपंढरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात यंदा द्राक्षाची गोडी उशिरा चाखता येणार आहे. त्याचे कारण म्हणजे यंदाच्या वर्षी सातत्याने पडणारा मुसळधार. नाशिकमधून परदेशात पाठविण्यासाठी नाशिकचा द्राक्ष हा गुणवत्तापूर्ण द्राक्ष असल्याने मोठी मागणी असते. त्याची चव देखील इतर देशांतील द्राक्षाच्या तुलनेत चांगली असल्याने नाशिकचे द्राक्ष जगात भारी म्हणून ओळखला जातो. नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी यंदाच्या वर्षी मोठ्या प्रमाणात अडचणीत आहे. सातत्याने होणाऱ्या पावसाने द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. अजूनही बऱ्याच शेतातून पाण्याचा निचरा होऊ शकलेला नाही. दरवर्षी सप्टेंबर अखेर पर्यन्त पाऊस हा थांबत असतो, त्यानंतर द्राक्ष बागेच्या छाटणीला सुरुवात होत असते. मात्र, यंदाच्या वर्षी पाऊसही उशिरा दाखल झाल्याने पाऊसही उशिरा उघडला आहे. त्यात आता ऑक्टोबर महिना उलटला नोव्हेंबर महिना सुरू झाला तेव्हा कुठे छाटणीला सुरुवात झाली आहे.

यंदाच्यावर्षी पाऊस उशिरा पडल्याने आणि उघडल्याने द्राक्ष बागेच्या फळधारणेसह उत्पादनावर परिणाम करणार आहे.

नाशिक जिल्ह्यातून द्राक्षाची होणारी निर्यात यंदाच्या वर्षी लांबणार असून निर्यात धोरण बदलल्याने त्याचाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

साधारणपणे द्राक्षाची परिस्थिती पहिली तर सप्टेंबर अखेरपर्यंत पाऊस थांबतो आणि ऑक्टोबर महिन्यातंय द्राक्ष बागांच्या छाटणीला सुरवात होत असते.

यंदाच्या वर्षी हे गणित महिन्याने लांबणीवर पडले आहे, ऐन थंडीत द्राक्षाची छाटणी यंदा होणार असून द्राक्ष मण्यांच्या फुगणीवर याचा परिणाम होणार आहे.

यंदाच्या वर्षी पावसामुळे द्राक्षाचे गणित कोलमडले असल्याने रोगराई पसरणार असल्याने औषध फवारणी अधिकची करावी लागणार असून त्याचा खर्च देखील वाढणार आहे.

रेंगाळलेला पाऊस आणि लवकर पडलेली थंडी यामुळं द्राक्ष हंगाम एक दीड महिना पुढे ढकलला गेला आहे .त्यामुळे द्राक्ष चाखण्यासाठी वेळ तर लागेलच पण द्राक्षाला मिळणारा भावही यंदाच्या वर्षी कमी लागणार आहे.


Web Title – द्राक्षाची गोडी लांबली… यंदाच्या वर्षी द्राक्ष बागायतदारांना असा बसणार मोठा फटका – grapes rain prolong the grape season farmers suffer due to grape export policies

Leave a Comment

Share via
Copy link