पोल्ट्री व्यवसाय करताय किंवा करण्याच्या विचारात असाल तर आता "ही" परवानगी बंधनकारक - govt permission for poultry project central pollution control board order - DigiShivar
मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

पोल्ट्री व्यवसाय करताय किंवा करण्याच्या विचारात असाल तर आता “ही” परवानगी बंधनकारक – govt permission for poultry project central pollution control board order

शेती व्यवसायात जर कधी नुकसान झाले तर कधी-कधी शेतीपूरक असलेला पोल्ट्री व्यवसाय आधार बनत असतो.

पोल्ट्री व्यवसाय करताय किंवा करण्याच्या विचारात असाल तर आता ही परवानगी बंधनकारक

Image Credit source: Social Media

नाशिक : पोल्ट्री व्यवसाय म्हणजेच कुक्कुटपालन करत असतांना आता आणखी एक परवानगी घ्यावी लागणार आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळासह आता सरकारची परवानगी घेणं बंधनकारक करण्यात आली आहे. खरंतर यापूर्वी ग्रामीण भागात असणारा हा व्यवसायाला ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत स्तरावर ना हकरत दाखल मिळाला की व्यवसाय करण्यास परवानगी मिळत होती. मात्र, आता हरित लवादात दाखल करण्यात आलेल्या गौरी माउलीखी यांनी एक याचिका दाखल केली होती. त्यानुसार पाच हजार अधिक प्रकल्प असलेल्या प्रकल्पाला विशेष परवानगी घ्यावी लागणार आहे. नुकत्याच झालेल्या सूनवटणीत हरित लवादाने याबाबत निकाल दिला आहे. त्यानुसार पोल्ट्री व्यवसायासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळासह सरकारची परवानगी बंधनकारक असेल. याशिवाय पाच हजारांहून अधिक पक्षी असलेले व्यावसायिक या अधिकार कक्षेत ठेवण्यात आले आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने याबाबत सविस्तर आदेश जारी केले असून नवीन वर्षात या आदेशाची अंमलबजावनी सुरू होणार आहे.

शेती व्यवसायाबरोबरच ग्रामीण भागात जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी पोल्ट्री व्यवसाय म्हणजेच कुक्कुटपालन करत असतात.

शेती व्यवसायात जर कधी नुकसान झाले तर कधी-कधी शेतीपूरक असलेला पोल्ट्री व्यवसाय आधार बनत असतो.

मात्र गेल्या काही वर्षांमध्ये पोल्ट्री व्यवसाय मोठ्या अडचणीत सापडला आहे. बर्ड फ्ल्यू आणि त्यानंतर आलेल्या कोरोनाने पोल्ट्री व्यवसाय करणारा शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला आहे.

मात्र, हाच पोल्ट्री व्यवसाय करत असतांना आता पोल्ट्री व्यवसायकाला बंधने घालण्यात आली असून त्याचे पालन करावे लागणार आहे.

पाच हजारांपेक्षा अधिक पक्षी असलेल्या प्रकल्पाला प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी बंधनकारक असेल.

याशिवाय कुक्कुटपालन प्रकल्प उभारताना लोकवस्तीपासून पाचशे मीटर लांब प्रकल्प असावा लागणार आहे. तसेच, नदी-नाल्यापासून दूर असावा.

आणखी एक महत्वाची बाब म्हणजे राष्ट्रीय महामार्गापासून आणि मुख्य रस्त्यापासून शंभर मीटर हा प्रकल्प दूर यांसह विविध अटी ठेवण्यात आल्या आहे.


Web Title – पोल्ट्री व्यवसाय करताय किंवा करण्याच्या विचारात असाल तर आता “ही” परवानगी बंधनकारक – govt permission for poultry project central pollution control board order

Leave a Comment

Share via
Copy link