नाशिकमधील वाढती थंडी काही शेतकऱ्यांना फलदायी ठरत असून काही शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बाब ठरत आहे, सहा अंशाच्या जवळ पारा पोहचला असून येत्या काळात आणखी तापमानाचा पारा घसरण्याची शक्यता आहे.

Image Credit source: Google
नाशिक : राज्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस घसरत चालला आहे. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील पारा जवळपास 6 अंशाच्या खाली आला आहे. त्यामुळे राज्यातील सर्वाधिक थंडी महाबळेश्वर पेक्षाही नाशिकमध्ये पडू लागली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग धास्तावला असून शेती पिकाचे काय होईल अशी चिंता व्यक्त करू लागला आहे. नाशिकमधील तापमानाचा पारा घसरल्याने काही शेतकऱ्यांना फायदा होतो तर काही शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसतो. यामध्ये थंडीचा जोर जसा-जसा वाढत जातो तस-तसा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत जातात. थंडीमुळे द्राक्ष मण्याला तडे जातात. त्यामुळे द्राक्ष बागा वाचवायच्या यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जातात. तर दुसरीकडे हरभरा, कांदे या पिकांना मात्र थंडीचा दिलासा भेटत असतो. पिकाची फुगवण होण्यासाठी थंडी फायदेशीर ठरत असते. त्यामुळे राज्यातील थंडीचा नाशिकमधील शेतकऱ्यांना फायदा आणि तोटा असा दुहेरी भावना निर्माण होत असते.
नाशिकमध्ये थंडीचा जोर वाढला की द्राक्ष बागेत पाणी सोडणे, धूर करणे, पोग्यात पाणी जाऊ नये यासाठी बागा झटकणे, औषध फवारणी करणे अशी विविध कामे करावी लागतात.
पहाटेच्या थंडीने तर अक्षरशः द्राक्ष मनी कडक झाल्याने त्यांना तडे जाऊन ते जमिनीवर पडत असतात, त्यामुळे हाता-तोंडाशी आलेला घास जातो की काय अशी स्थिती निर्माण होते.
त्यातच दुसरींकडे डाळिंब या पिकावर रोगराई पसरल्याने औषध फवारणी करावी लागते, त्यामुळे द्राक्ष आणि डाळिंब उत्पादक शेतकरी चिंतेत असतात.
तर दुसरीकडे गहू, हरभरा आणि कांदा या पिकाला थंडी फलदायी असते, थंडीने ही पिके अधिक जोमाने येतात, त्यामुळे पारा घसरला तरी या पीक उत्पादक शेतकऱ्यांना चिंतेचे कारण नाही.
मात्र, याच काळात जर अधिकच्या थंडीने धुके पसरले तर जवळपास सर्वच पिकांवर औषध फवारणी करावी लागते, पिकावर रोग येण्याची शक्यता अधिक असते, त्यात द्राक्ष आणि डाळिंब आणि कांदे या पिकांची काळजी घ्यावी लागते.
नाशिक जिल्ह्यातील ही प्रमुख पिके असल्याने नाशिकमधील थंडी शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाची असते, सध्याची थंडी मात्र डोकदुखी ठरत आहे.
Web Title – हाडं गोठवणारी हुडहुडी कुणाचं टेन्शन वाढवते ? तर हाडे गोठवणारी हुडहुडी कुणाच्या पथ्यावर ? – What is the benefit and loss of cold in the state on agricultural crops
