Nashik | लाल चिखल व्हायचाच बाकी, टोमॅटोने डोळ्यात पाणी, पंधरा दिवसात भाव पाहा कुठवर पोहोचले Video - The prices of Nashik tomatoes fell drastically - DigiShivar
मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

Nashik | लाल चिखल व्हायचाच बाकी, टोमॅटोने डोळ्यात पाणी, पंधरा दिवसात भाव पाहा कुठवर पोहोचले Video – The prices of Nashik tomatoes fell drastically

औषधाचा खर्च तसेच कामगारांचा पगार कसा करावा, असा मोठा प्रश्न टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यासमोर निर्माण झाला आहे.

चंदन पूजाधिकारी, नाशिकः  सगळ्या राज्यांमध्ये स्थानिक गावातील टोमॅटो (Tomato) येत असल्याने येत असल्याने टोमॅटोच्या भावात घसरण बघायला मिळत आहे. जे कॅरेट 500 ते 600 रुपये विकली जात होती, तीच आता 100 ते 80 रुपयाने विकण्याची वेळ टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यावर (Farmers) आली आहे. परिणामी 2 ते 3 रुपये किलो एवढ्या दराने टोमॅटो विकण्याची वेळ ओढवली आहे. निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथे टोमॅटोचे (Nashik Tomato) भावात मोठ्या प्रमाणात घसरलेले दिसून आले. बेंगलोर, राजस्थान, शिवपुरी, गुजरात या राज्यांमध्ये स्थानिक गावातील टोमॅटो येण्यास सुरुवात झाली. मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आवक वाढल्याने जे टोमॅटो 500 ते 600 रुपये कॅरेटने विकले जात होते ते आता 100 ते 80 रुपये कॅरेटने विकण्याची वेळ टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांवर येत आहे. त्यामुळे केलेला उत्पादन खर्च देखील निघणे मुश्किल झाला आहे. औषधाचा खर्च तसेच कामगारांचा पगार कसा करावा, असा मोठा प्रश्न टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यासमोर निर्माण झाला आहे.


Web Title – Nashik | लाल चिखल व्हायचाच बाकी, टोमॅटोने डोळ्यात पाणी, पंधरा दिवसात भाव पाहा कुठवर पोहोचले Video – The prices of Nashik tomatoes fell drastically

Leave a Comment

Share via
Copy link