राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढणार! राज्यात पुन्हा पाऊसाची शक्यता, कधी आणि काय आहे शक्यता ? जाणून घ्या - The Pune Meteorological Department has predicted the possibility of rain in the state till December 15 - DigiShivar
मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढणार! राज्यात पुन्हा पाऊसाची शक्यता, कधी आणि काय आहे शक्यता ? जाणून घ्या – The Pune Meteorological Department has predicted the possibility of rain in the state till December 15

पुणे हवामान विभागाने पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. ऐन हिवाळ्यात आणि त्यातच कडाक्याची थंडी पडलेली असतांना हा अंदाज वर्तविण्यात आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे.

राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढणार! राज्यात पुन्हा पाऊसाची शक्यता, कधी आणि काय आहे शक्यता ? जाणून घ्या

Image Credit source: Google

योगेश बोरसे, पुणे : पुणे हवामान विभागाने नुकताच एक अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे. राज्यात कधीही 15 डिसेंबर पर्यन्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे ऐन हिवाळ्यात पाऊस पडणार असल्याचे चित्र निर्माण झाल्याने शेतकऱ्यांसाठी हे धोकेदायक आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नुकसानीला तोंड देण्याची वेळ येते की काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बेमोसमी पाऊसाने आधीच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात आता ऐन हिवाळ्यात पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा आर्थिक संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यापासून बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण, काही भागांत हलका पाऊस तर काही ठिकाणी तुरळक जोरदार पाऊसही पडण्याची शक्यता आहे. मॅनदौस या चक्रीवादळामुळे दक्षिणेकडील राज्यांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. महाराष्ट्रात 15 डिसेंबरपर्यन्त कधीही पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

पुणे हवामान विभागाने पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. ऐन हिवाळ्यात आणि त्यातच कडाक्याची थंडी पडलेली असतांना हा अंदाज वर्तविण्यात आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे.

यंदाच्या वर्षी बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, शेतमाल हातातून गेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा असेच संकट आले तर शेतकरी पुरता हवालदिल होणार आहे.

मॅनदौस या चक्रीवादळामुळे दक्षिणेकडील राज्यांत जोरदार पावसाची शक्यता, वर्तविण्यात आल्याने महाराष्ट्रात पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.

11 ते 14 डिसेंबर या कालावधीत राज्यात पावसाची शक्यता अधिक आहे, त्यामुळे द्राक्ष उत्पादक, कांदा उत्पादक, गहू उत्पादक यांना मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शेतमालाचे नुकसान झाल्यानंतर मिळालेली तोकडी नुकसान भरपाई, आणि त्यात पुन्हा ऐन हिवाळ्यात पाऊस तोही शेतमाल हाताशी आलेले असतांना त्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

पुणे हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण, काही भागांत हलका पाऊस, तर तुरळक ठिकाणी जोरधारांचीही शक्यता वर्तविली आहे.


Web Title – राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढणार! राज्यात पुन्हा पाऊसाची शक्यता, कधी आणि काय आहे शक्यता ? जाणून घ्या – The Pune Meteorological Department has predicted the possibility of rain in the state till December 15

Leave a Comment

Share via
Copy link