महाबळेश्वर पेक्षा निफाड तालुका थंड असल्याचे समोर आले आहे, या कडाक्याच्या थंडीपासून उब मिळवण्यासाठी ठिकठिकाणी नागरिक शेकोट्या पेटवत आहे.

Image Credit source: TV9 Network
उमेश पारिक, निफाड (नाशिक) : राज्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वरची ओळख आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात सर्वाधिक नीचांकी तापमानाची नोंद होत आहे. त्यामुळे थंड हवेचे ठिकाण म्हणून निफाडची ओळख होऊ लागली आहे. उत्तरेकडून मोठ्या प्रमाणात थंड वारे येत असल्याने सलग दुसऱ्या दिवशीही थंडीचा कडाका वाढल्याने 17.1 अंशावरून थेट 4.9 अंशापर्यंत निफाड चा पारा घसरला आहे. निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान विभागात 6.3 अंश सेल्सिअस तर साकोरे मिग येथे 5.2 अंश सेल्सिअस तर ओझर येथील एचएएल येथे 4.9 अंश सेल्सिअस किमान तापमानाची निच्चांकी नोंद झाली आहे.
महाबळेश्वर पेक्षा निफाड तालुका थंड असल्याचे समोर आले आहे, या कडाक्याच्या थंडीपासून उब मिळवण्यासाठी ठिकठिकाणी नागरिक शेकोट्या पेटवत आहे.
मात्र दुसरीकडे थंडी वाढल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावले आहे. थंडी अशी टिकून राहिली तर द्राक्षबागेवर भुरी ,डाऊनी या रोगाचा प्रदुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे.
याशिवाय द्राक्ष बागांच्या पक्क्या मन्याणा तडे जाण्याची स्थिती निर्माण झाल्याने द्राक्ष उत्पादकांच्या अडचणीत वाढ झाली आहे तर ही वाढती थंडी गहू , हरभरा, कांदा, लसूण, ज्वारी पिकांना फायदेशीर आहे.
तर दुसरीकडे पुणे शहरातही पारा घसरला आहे. शहर परिसरात तापमानात एकाच दिवसात अचानक मोठी घट झाली असून शुक्रवारी पुण्यात ९.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.
निफाड तालुक्याचा असा घसरला किमान तापमानाचा पारा-
– दिनांक 6 मंगळवार रोजी 17.1 अंश सेल्सिअस किमान तापमान
– दिनांक 7 मंगळवार रोजी 14.5 अंश सेल्सिअस किमान तापमान
– दिनांक 8 मंगळवार रोजी 13.1 अंश सेल्सिअस किमान तापमान
– दिनांक 9 मंगळवार रोजी 7.2 अंश सेल्सिअस किमान तापमान
– दिनांक 10 मंगळवार रोजी 4.9 अंश सेल्सिअस किमान तापमान
Web Title – यंदाच्या हंगामातील सर्वाधिक नीचांकी तापमानाची नोंद कुठे? राज्यातील पारा घसरला – The lowest temperature has been recorded in the state today.
