cotton rate : कापसाच्या दरात घसरणीची काय आहे चीन कनेक्शन? - why cotton prices are falling in maharashtra - DigiShivar
मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

cotton rate : कापसाच्या दरात घसरणीची काय आहे चीन कनेक्शन? – why cotton prices are falling in maharashtra

चीनमध्ये कोरोनाचा कहर कमी झाला नाही. यामुळे केंद्र सरकारने चीनमध्ये कापसाची निर्यात करण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेतही कापसाचे दर गडगडले आहेत. गेल्या १५ दिवसांत त्याची किंमत १५०० ते २००० रुपयांपर्यंत घसरली आहे.

cotton rate : कापसाच्या दरात घसरणीची काय आहे चीन कनेक्शन?

कापसावर संकट

Image Credit source: सोशल मीडिया

मुंबई : cotton rate : शेतकरी आणि बाजारभाव यांच गणित नेहमी जुळत नसतं. शेतकऱ्यांचा माल बाजारात येतो तेव्हा दर पडलेले असतात. शेतकऱ्यांचा शेतमाल विकला गेला असताना बाजारात चढे दर असतात. याचा फायदा व्यापाऱ्यांना अधिक होत असतो. आता कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आलंय. शेतकऱ्यांचा कापूस बाजारात येण्यापुर्वी दहा हजार क्विंटलचा दर होता.आता हा दर सात ते आठ हजारांवर आलाय.

का घसरताय कापसाचे दर : 
चीनमध्ये कोरोनाचा कहर कमी झाला नाही. यामुळे केंद्र सरकारने चीनमध्ये कापसाची निर्यात करण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेतही कापसाचे दर गडगडले आहेत. गेल्या १५ दिवसांत त्याची किंमत १५०० ते २००० रुपयांपर्यंत घसरली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. चीनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने केंद्र सरकारने चीनमधून होणाऱ्या निर्यातीवर बंदी घातली आहे. बड्या व्यापाऱ्यांनी आधीच खरेदी केलेला कापूस त्यांच्याकडे पडून आहे. आता तर छोट्या व्यापाऱ्यांनीही कापूस खरेदी बंद केली आहे. त्याचा परिणाम आता स्थानिक बाजारपेठेवरही दिसून येत आहे. त्यामुळे कापसाचे भावात घसरण झालीय.

हे सुद्धा वाचा

यंदा उत्पादन कमी पण दर जास्त : 
अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे कापसाच्या उत्पादनात लक्षणीय घट झाली. यामुळे कापसाल चांगला भाव मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मागील वर्षी १२ हजारांपर्यंत कापसाचे दर होते. यंदा ते सात ते आठ हजारांवर आहे. शेतकऱ्यांना बियाणे, खते, औषधे, तण काढणी व कापूस वेचणीसाठी मोठा खर्च करावा लागतो. परंतु त्या तुलनेत दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणे अवघड झाले आहे.


Web Title – cotton rate : कापसाच्या दरात घसरणीची काय आहे चीन कनेक्शन? – why cotton prices are falling in maharashtra

Leave a Comment

Share via
Copy link