शेतकऱ्यांसमोरील संकटाची मालिका सुरूच आहे. पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा आगमन झाल्याने मध्यरात्री नाशिकच्या नांदगाव तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे.

Image Credit source: Google
नाशिक : शेतकऱ्यांवरील संकटांची मालिका सुरूच आहे. कधी अस्मानी संकट तर कधी सुलतानी संकट या दुहेरी संकटामुळे बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. नाशिक जिल्ह्यात तर अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. त्यामध्ये शेतीमालाचे नुकसान होत असतांना आर्थिक संकट उभे राहत आहे. अशातच हवामान ( IMD ) खात्याने दिलेल्या अंदाजानुसार सोमवारी मध्यरात्री विजेच्या कडकाटासह झालेल्या अवकाळी पावसामुळे नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील तांदूळवाडी येथील एका 60 वर्षीय शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू ( Farmer Death News ) झाला आहे. शेतात काढून ठेवलेले कांदे झाकण्यासाठी शेतकरी शेतात गेला असता अंगावर वीज पडून जागीच ठार झाला आहे. नाना गमन चव्हाण असे या शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Web Title – मध्यरात्री विजेच्या कडकाटासह पाऊस सुरू झाला, बळीराजा झोपेतून उठून बाहेर आला आणि घडली मन सुन्न करणारी घटना… – nashik news A farmer from Nandgaon in Nashik district has died due to lightning
