गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आता टोकाचे पाऊल उचलले आहे. कवडीमोल भावाने शेतीमाल घेतला जात असल्याने पीक भूईसपाट करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे.

येवला/नाशिक : राज्यातील सरकार कोणतंही असो, सत्तांतर होऊन सरकार बदलले गेले तरी शेतकऱ्यांच्या परिस्थितीमध्ये मात्र कोणताही बदल झाल्याचे दिसून येत आहे. शेतीच्या प्रत्येक हंगामात कोणत्या ना कोणत्या समस्यांचा डोंगर मात्र हटता हटेना अशी अवस्था शेतकऱ्यांच्या झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळत नाही. शेतकऱ्यांनी पिकासाठी केलेला खर्चही शेतीमालातून निघणं कठीण झाले आहे. शेतीमाल एक क्विंटल घालूनही शेतकऱ्यांच्या हातात शंभर रुपये मिळणे कठीण झाले आहे.
Web Title – कोबीला मातीमोल भाव; 2 एकरातील भाजीवर रोटर फिरवला… – Farmers in Yeola taluka of Nashik district rotated the tractor on cabbage crop as agriculture did not get proper market.
