नोकरदारवर्ग ज्याप्रमाणे आठ तास काम करतो, त्याच पद्धतीने शेतकऱ्यांनी कमीत कमी आठ तास शेतीत काबाडकष्ट केले तर शेतकरी नक्कीच यशस्वी होऊ शकतो अशा भावना सहाणे बंधूंच्या आहेत.

संगमनेर/अहमदनगरः सध्या शेती क्षेत्राबाबत समस्यांचा डोंगर उभा राहिलेला असतानाच काही शेतकऱ्यांनी त्यातून पर्याय शोधण्याचा मार्ग काढला आहे. राज्यात सध्या कांदा प्रश्नामुळे शेतकरी हैराण झाले असतानाच काही शेतकरी मात्र शेतीतील वेगवेगळ्या प्रयोगामुळे त्यातून नवीन अर्थकारण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. असाच एक नवा प्रयोग अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरही फुलाप्रमाणं थोडंफार हसू उमललेलं आहे.
Web Title – या ‘अप्सरा’ने शेतकऱ्याच्या आयुष्यात आणली सोन्याची खाण; शेतीत या दोन बंधूंचा नवा प्रयोग – Marigold flowers got good market price, a new experiment in agriculture in Sangamner taluk of Ahmednagar district
