हा कांदा आहे की, कांदोबा; वजन सरासरी इतके ग्रॅम, चर्चा या कांदा उत्पादकाची - Is this onion, kandoba; The average weight is so grams, discussion of this onion producer - DigiShivar
मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

हा कांदा आहे की, कांदोबा; वजन सरासरी इतके ग्रॅम, चर्चा या कांदा उत्पादकाची – Is this onion, kandoba; The average weight is so grams, discussion of this onion producer

शंकर देवकुळे

शंकर देवकुळे | Edited By: गोविंद हटवार, Tv9 मराठी

Updated on: Feb 27, 2023 | 4:33 PM

कांदा उत्पादक शेतकऱ्याने कांद्यामध्ये भरघोस उत्पादन घेतले आहे. विशेष म्हणजे एका कांद्याचे वजन तब्बल पाऊण किलो इतका भरत आहे.

हा कांदा आहे की, कांदोबा; वजन सरासरी इतके ग्रॅम, चर्चा या कांदा उत्पादकाची

सांगली : अबब! कांदा की कांदोबा. तब्बल पाऊण किलो वजनांचे कांदे. पलूस तालुक्यातल्या ब्रम्हनाळ येथील एका शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये तब्बल पाऊण किलो वजनाच्या कांद्याचे उत्पादन घेतले. मात्र जिल्ह्यात या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चांगलीच चर्चा रंगली. राज्यात सध्या कांद्याच्या गडगडलेल्या दरामुळे कांद्यावरून राजकारण पेटले आहे. कांद्याला कवडीमोल दर मिळत आहे. सांगलीतील एका कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मात्र चांगलीच चर्चा रंगली आहे. पलूस तालुक्यातल्या ब्रम्हनाळ येथील एका शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये तब्बल पाऊण किलो वजनाच्या कांद्यांचे उत्पादन घेतले आहे. हा पाचशे ते सातशे ग्रॅमचा कांदा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. या कांद्याचे आम्हाला बीजायत मिळेल काय, यासाठी या कांद्याला चांगली मागणी आली आहे. बीड कुठून आणलं होतं. आमच्यासाठी अशा कांद्याचं बीजायत द्या, अशी मागणी परिसरातील शेतकरी करू लागले आहेत.


Web Title – हा कांदा आहे की, कांदोबा; वजन सरासरी इतके ग्रॅम, चर्चा या कांदा उत्पादकाची – Is this onion, kandoba; The average weight is so grams, discussion of this onion producer

Leave a Comment

Share via
Copy link