या गावाची ओळख होतेय ऑरेंज व्हिलेज म्हणून; गावात इतक्या एकर जागेवर संत्रा लागवड - This village is known as Orange Village; Orange cultivation on so many acres of land in the village - DigiShivar
मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

या गावाची ओळख होतेय ऑरेंज व्हिलेज म्हणून; गावात इतक्या एकर जागेवर संत्रा लागवड – This village is known as Orange Village; Orange cultivation on so many acres of land in the village

विठ्ठल देशमुख

विठ्ठल देशमुख | Edited By: गोविंद हटवार, Tv9 मराठी

Updated on: Feb 21, 2023 | 12:24 PM

यावर्षी यांच्या शेतातील संत्र्याच्या ४४० झाडापैकी चारशे झाडांना भरघोस संत्रा लागले आहेत. यांच्या अंदाजानुसार २८०० ते ३००० कॅरेट माल यांच्या संत्र्याचा निघेल. १९ लाख रुपयांचे भरघोस उत्पन्न या संत्र्याच्या फळबागापासून एका वर्षात मिळणार आहे.

या गावाची ओळख होतेय ऑरेंज व्हिलेज म्हणून; गावात इतक्या एकर जागेवर संत्रा लागवड

वाशिम : वनोजा परिसराची आता ऑरेंज व्हिलेज म्हणून ओळख निर्माण होत आहे. वनोजा परिसरात जवळपास २ हजार एकर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी संत्रा फळ बागेची लागवड केली. दोन एकरात १९ लाखांचे उत्पन्न काढल्यामुळे एक शेतकरी संत्र्यांमुळे मालामाल झाला आहे. वनोजा येथील अल्पभूधारक शेतकरी पुरुषोत्तम राऊत यांनी हा यशस्वी प्रयोग केला आहे. आधी ते आपल्या शेतात पारंपरिक पद्धतीने सोयाबीन, तुर, हरबरा याचे पीक घेत होते. मात्र त्यांना पारंपारिक शेती करुन काहीच मिळत नव्हते. त्यामुळे त्यांनी संत्रा फळबाग लावण्याचे ठरवले. त्यांनी सात वर्षांपूर्वी आपल्या दोन एकर शेतात जंबेरी या जातीच्या ४५० संत्रा झाडाची २० बाय १२ या पद्धतीने लागवड केली. पाण्याचे योग्य नियोजन करत संत्र्यांची बाग फुलवली. त्यांनी केलेल्या कष्टामुळे फळबागेला यावर्षी चांगला बहार धरला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी या शेतकऱ्याकडे धाव घेत. यावर्षी ७०० रुपये कॅरेटप्रमाणे संत्राचा बगीच्या मागितला आहे. यामध्ये २८०० कॅरेट संत्रा निघेल असा अंदाज आहे.जवळपास १९ लाख ६० हजार रुपयांचे उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा आहे.


Web Title – या गावाची ओळख होतेय ऑरेंज व्हिलेज म्हणून; गावात इतक्या एकर जागेवर संत्रा लागवड – This village is known as Orange Village; Orange cultivation on so many acres of land in the village

Leave a Comment

Share via
Copy link