स्वस्त धान्य दुकानांवर केंद्र सरकारचे चुकीच्या धोरणांमुळे नंदुरबार जिल्ह्यातील एक हजार 64 स्वस्त धन्य दुकान तीन दिवसाच्या संपावर गेले होते.

Image Credit source: tv9marathi
जितेंद्र बैसाणे, नंदुरबार : जिल्ह्यातील तापी काठावरील (Tapi River) गावांना वेळेवर वीजपुरवठा होत नसल्याने, मोठ्या प्रमाणावर शेतीच्या नुकसान असल्याची समस्या वेळोवेळी शेतकऱ्यांनी मांडली आहे. वेळेवर वीजपुरवठा होत नसल्याने, रब्बी हंगामातील पिकांना पाणी मिळत नाही. नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी (Nandurbar farmer) आधीच मोठा अडचणीत सापडला आहे. खरीप हंगामातील कापूस, मिरची,सोयाबीन, या पिकांना आधीच हमी भाव नाही. तर रब्बी हंगामातील (ruby seoson) हवामानात बदल होत असल्याने, गहू, हरभरा, कांदा, बाजरी, या पिकांच्या उत्पन्नात घट होणार असल्याचं दिसत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती दुष्काळात तेरावा महिना अशी झाली आहे. आता महावितरण कंपनीकडून येऊन ठेपले आहे. मात्र वीजपुरवठा वेळेवर महावितरण मिळणार नाही तर शेतकरी आता रस्त्यावर देखील उतरण्याची तयारी करत आहे.
जिल्ह्यातील हजारो कुटुंबांना वेळेवर रेशन मिळालं नाही
स्वस्त धान्य दुकानांवर केंद्र सरकारचे चुकीच्या धोरणांमुळे नंदुरबार जिल्ह्यातील एक हजार 64 स्वस्त धन्य दुकान तीन दिवसाच्या संपावर गेले होते. त्यामुळे अनेक नागरिकांना वेळेवर धन्य मिळालं नव्हतं, तीन दिवसानंतर आजपासून पुन्हा स्वस्त धान्य दुकान सुरू होणार आहेत. केंद्र सरकारने घेतलेल्या रेशनिंग दुकान दारकांवर नवीन निर्यात कायद्यामुळे दुकानदारांचे व्यवसाय बंद करण्याचे वेळ येऊन ठेपली आहे. या निर्णयाच्या विरोधात अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार आणि केरोसीन परवानाधारकांच्या संघटनेने तीन दिवस दुकान बंद ठेवण्याच्या निर्णय घेतला होता. या तीन दिवसाच्या संपामुळे जिल्ह्यातील हजारो कुटुंबांना वेळेवर रेशन मिळालं नाही. मात्र केंद्र सरकारने निर्यात नवीन कायद्यात बदल केला नाही तर महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार आणि केरोसीन परवानाधारकांच्या संघटनेने आणखीन तीव्र आंदोलन करण्याच्या देखील इशारा देण्यात आलेला आहे.
एक अधिकारी दोन ते तीन विभागाच्या जबाबदाऱ्या
नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रिक्त पद असल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे. नंदुरबार जिल्हा सातपुडाच्या डोंगर रांगांमध्ये बसलेला असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर आरोग्याच्या आणि शेतीशी निगडित असलेल्या समस्या उद्भवत असतात. मात्र दुर्गम भागात सुविधा नसल्याने जिल्ह्याच्या ठिकाणी यावं लागत असतं. परंतु जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रिक्त पद असल्याने नागरिकांचे काम वेळेवर होत नाही आहेत. अशा अनेक तक्रारी समोर येत आहेत एक अधिकारी दोन ते तीन विभागाच्या जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे राज्य शासन आता लवकरच रिक्त पद भरणार आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक कुपोषण, बालमृत्यू, माता, मृत्यू या आरोग्याच्या समस्या दूर होतील, त्यासोबत शिक्षणासाठी शेती कामासाठी लागणारे दाखले रिक्त पदा भरल्यामुळे वेळेवर मिळतील यामुळे लवकरच रिक्त पदा भरले जातील असं राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितलं आहे.
Web Title – Nandurbar : नंदुरबार जिल्ह्यातल्या समस्यांना जबाबदार कोण ? नागरिकांनी दाद मागायची कोणाकडे – Who is responsible for the problems in Nandurbar district? To whom should the citizens appeal
