लम्पीमुळे मृत पावलेल्या जनावरांच्या मालकांना मदत जाहीर! कुणाला किती आर्थिक साहाय्य? जाणून घ्या! - lampi disease state government of Maharashtra announced financial help for farmers know who will get how much in detail - DigiShivar
मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

लम्पीमुळे मृत पावलेल्या जनावरांच्या मालकांना मदत जाहीर! कुणाला किती आर्थिक साहाय्य? जाणून घ्या! – lampi disease state government of Maharashtra announced financial help for farmers know who will get how much in detail

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! लम्पीमुळे आजारामुळे शेकडो जनावांचा मृत्यू, अखेर सरकारकडून मदतीची घोषणा

लम्पीमुळे मृत पावलेल्या जनावरांच्या मालकांना मदत जाहीर! कुणाला किती आर्थिक साहाय्य? जाणून घ्या!

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

Image Credit source: TV9 Marathi

हिरा ढाकणे, TV9 मराठी, प्रतिनिधी : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्रात (Maharashtra Agriculture News) लम्पी आजारामुळे शेतकऱ्यांचं (Farmers) मोठं नुकसान झालंय. एकीकडे जनावरं आजारी पडून दगावत आहेत. तर दुसरीकडे त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर जनावरं दगावल्याने आर्थिक संकट ओढवलंय. अशातच आता राज्य सरकारनं (State Government) शेतकऱ्यांना दिलासादायक निर्णय घेतला आहे. लम्पी आजारामुळे दगावलेल्या जनावरांच्या मालकाला आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली आहे. बुधवारी (12 ऑक्टोबर, 2022) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतच महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय.

कुणाला किती अर्थसहाय्य?

दुधाळ गायीचा मृत्यू झालेला असल्यास मालकाला 30 हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे. लम्पी आजारामुळे बैलाचा मृत्यू झाल्यास 25 हजार रुपयांचं आर्थिक साहाय्य करण्यात येणार आहे. तर वासराचा मृत्यू झाल्या 16 हजार रुपयांची मदत संबंधित मालकाला मिळणार आहे.

मृत पावलेल्या पशुधनाचा प्रकार अर्थसहाय्य (प्रति जनावर)
दुधाळ जनावरं (गाय) रुपये 30,000/-
ओढकाम करणारी जनावरं (बैल) रुपये 25,000/-
वासरं रुपये 16,000/-

शिंदे-फडणवीस सरकारकडून कडून मदतीचा शासन आदेश बुधवारी जारी करण्यात आलाय. 4 ऑगस्टपासून ज्यांची जनावरं लम्पी आजारामुळे मृत्युमुखी पडली आहेत, त्यांना सरकारकडून आर्थिक मदत करण्यात येणार आहे.

पाहा स्पेशल रिपोर्ट

काय असणार निकष?

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणातील निकषांप्रमाणे ही मदत जाहीर करण्यात आली आहे. अल्प भूधारक, अत्यल्प भूधारक हे निकष शिथील करून राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणातील आर्थिक निकषांप्रमाणे सर्वांना अर्थसहाय्य मिळावं, या अनुषंगाने राज्य सरकारने मदतीची घोषणा केली आहे.

हे सुद्धा वाचा

मृत पशुधनाच्या संख्येवरील निर्बंधांचे निकष सुद्धा ही मदत देताना शिथील करण्यात येणार आहेत. लम्पी चर्मरोग प्रादुर्भावामुळे ज्या शेतकरी, पशुपालक यांच्याकडे असलेल्या पशुधनाचा मृत्यू झाला, अशा सर्व शेतकरी, पशुपालकांना अर्थसहाय्य देण्याचे निर्देश देण्यात आलेत. या निर्णयामुळे असंख्य शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.


Web Title – लम्पीमुळे मृत पावलेल्या जनावरांच्या मालकांना मदत जाहीर! कुणाला किती आर्थिक साहाय्य? जाणून घ्या! – lampi disease state government of Maharashtra announced financial help for farmers know who will get how much in detail

Leave a Comment

Share via
Copy link