मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

कृषी क्षेत्रात AI; एआयवर आधारीत शेतकरी ॲप, पोर्टलचा लवकरच श्रीगणेशा – Marathi News | AI in Maharashtra agriculture department; AI based farmer app, Portal’s will be launched Soon

राज्यात कृषी क्षेत्र घोटाळ्याच्या नकाशावर आले आहे. सध्या विविध घोटाळे आणि अनियमिततेमुळे कृषी क्षेत्र सध्या चर्चेत आहे. पीक विमा घोटाळा, हार्वेस्टर आणि इतर घोटाळे गाजत असतानाच कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमतेवर शेतकरी ॲप, पोर्टलचा लवकरच श्रीगणेशा होत आहे. सर्व योजनांची, अनुदान, तक्रार, मदत या सर्वांची एकाच ठिकाणी शेतकर्‍यांना माहिती मिळणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढल्यानंतर पिकांच्या उत्पादनात वाढ होईल. मजुरीच्या खर्चात बचत करता येईल. रासायनिक खते आणि औषधांच्या वापरात कपात होईल. वेळीच रोग, कीड यांची माहिती मिळाल्याने पिकांचे नुकसान टाळता येईल. शेतकऱ्यांचे नुकसान टळेल.

समिती पण केली गठीत

शेतकऱ्यांच्या विविध अडचणी, प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी, कृषी योजनांची एकत्र माहिती देण्यासाठी एक खिडकी योजनेच्या धरतीवर हे एआय आधारीत शेतकरी ॲप, एआय आधारित पोर्टल सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी राज्य सरकारने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. १५ दिवसांत ही समिती अहवाल सादर करणार आहे.

हे वाचलंत का? -  PM Kisan Samman Nidhi Yojana: मोदी 3.0 सरकारच्या पहिल्याच दिवशी शेतकरी सन्मान निधीचा सतरावा हप्ता जारी, चेक करा तुमचा बॅलेन्स - Marathi News | Pm kisan yojana modi governments first decision seventeenth installment to farmers marathi news

हे सुद्धा वाचा

असा होईल फायदा

बेमौसमी पाऊस, वातावरणातील बदल, पिकांवरील रोगाचा प्रादुर्भाव याची माहिती कृत्रिम बुद्धिमतेचा वापर करून मिळेल. एआयच्या वापरामुळे शेतकर्‍यांचे उत्पादन वाढण्यास मदत होईल. मजूरी आणि इतर खर्चात बचत होण्यासाठी एआयचा वापर करण्यात येईल. त्यामुळे शेती क्षेत्रात सुधारणा आणि बदल होण्यास मदत होईल.

एआयमुळे मातीतील कार्बन प्रमाण जाणून घेणे, माती परीक्षण, माती आरोग्य, तणाचा प्रकार ओळखणे, मातीचे तापमान, वातावरणातील आर्द्रता, पिकांवरील कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव ओळखणे यासाठी कृत्रिम बुद्धीमता वरदान ठरेल. या प्रयोगामुळे शेतकऱ्यांना ऑनलाईन मोफत सेवा आणि सल्ला मिळेल. त्यआधारे शेती क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवता येतील.

हे वाचलंत का? -  दिवसा ऑक्टोबर हिट, रात्री मुसळधार, राज्यात काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस, पिकांचे मोठे नुकसान

अंजली दमानिया यांचे आरोप धादांत खोटे

हे वाचलंत का? -  सरकारच्या एका निर्णयाने शेतकऱ्यांना मोठा फायदा, बाजारात 50-80 रुपयांनी विकतोय कांदा, अजून वाढतील का भाव? कांदा ग्राहकांना रडवणार? - Marathi News | Onion And Basmati Export Decision A decision of the government is a big benefit to the farmers, onion is being sold at 50 80 rupees in the market, will the prices increase further? Onion will make customers cry

मार्च २०२४ मध्ये राबवण्यात आलेली निविदा प्रक्रिया ही संपूर्ण पणे नियमात आणि शासनाच्या धोरणाला अनुसरून राबवली आहे. आज नाही. मागच्या ५० दिवसात त्या माझ्यावर वेगवेगळे आरोप केले आहेत. त्यातील एकही आरोप सिद्ध झाला नाही. अंजली दमानिया यांचे आरोप खोटे असल्याचा दावा मंत्री धनंजय मुंडे यांनी केला.


Web Title – कृषी क्षेत्रात AI; एआयवर आधारीत शेतकरी ॲप, पोर्टलचा लवकरच श्रीगणेशा – Marathi News | AI in Maharashtra agriculture department; AI based farmer app, Portal’s will be launched Soon

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj