Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे अनेक महिलांना आर्थिक मदतीचा मोठा आधार मिळत आहे. मात्र, ज्या महिलांना या योजनेचा लाभ नको आहे, त्यांच्यासाठी सरकारकडून एक महत्त्वाचं आवाहन करण्यात आलं आहे. आपण या योजनेचे पात्र नाही किंवा भविष्यात यामुळे काही अडचणींना सामोरे जावे लागू शकते, असे वाटत असेल, तर तुम्ही या योजनेतून बाहेर पडू शकता. चला जाणून घेऊया, ही प्रक्रिया कशी सोपी आहे आणि तुम्हाला नेमकं काय करायचं आहे.
महिलांनी जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आणि नंतर त्यांच्या परिस्थितीत बदल झाला, तर त्यांनी हा लाभ नाकारणेच योग्य ठरेल. उदाहरणार्थ, जर कोणत्याही लाभार्थी महिलेचं वार्षिक उत्पन्न वाढलं असेल, चांगली नोकरी लागली असेल, किंवा अर्ज चुकीच्या पद्धतीने भरला गेला असेल, तर या योजनेचा लाभ घेणं नियमबाह्य ठरू शकतं.
लाडक्या बहिणींनो, आर्थिकरित्या सक्षम महिलांवर कारवाई सुरु… सगळे पैसे परत वसूल होणार!
याशिवाय, ज्या महिलांच्या कुटुंबांकडे चारचाकी वाहन आहे, वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, किंवा दोन शासकीय योजनांचा फायदा घेत आहेत, अशा महिलांनी स्वतःहून योजनेतून बाहेर पडावं. सरकारने ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी तयार केली आहे, त्यामुळे गरजू महिलांनाच या योजनेचा फायदा मिळायला हवा.
लाडकी बहीण योजनेपासून दूर राहायचं असेल तर काय कराल?
जर तुम्हाला या योजनेचा फायदा नको असेल, तर सरकारने यासाठी खूप सोप्या उपाययोजना दिल्या आहेत. लाभ नको असल्यास तुम्ही खालीलप्रमाणे प्रक्रिया पूर्ण करू शकता:
आजच्या सोयाबीन दरात बदल, पहा आजचे सोयाबीन भाव..!
ऑफलाइन अर्ज:
आपल्या तालुक्यातील बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी कार्यालय, किंवा जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला भेट द्या.
लेखी अर्ज भरून द्या आणि आपली माहिती दुरुस्त करण्याची विनंती करा.
ऑनलाइन अर्ज:
https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जा.
‘तक्रार निवारण’ हा पर्याय निवडा आणि अर्ज ऑनलाइन सबमिट करा.
या प्रक्रियेमुळे भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत.
जानेवारीचा हप्ता कधी येणार?
लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता पुढील आठवड्यात लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होईल, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. पण या वेळी निकषांची पडताळणी काटेकोर पद्धतीने होणार आहे. ज्या महिलांनी नियमांच्या विरुद्ध जाऊन लाभ घेतला असेल, त्यांना या योजनेतून वगळण्यात येईल.
लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी:
जर तुमचं नाव योजनेतून वगळलं गेलं, तर याचा अर्थ तुम्ही या योजनेसाठी पात्र राहिला नाहीत. पण काळजी करू नका, कारण याआधी तुम्ही घेतलेल्या पैशांची वसुली सरकार करणार नाही. त्यामुळे भविष्याच्या दृष्टीने योग्य निर्णय घ्या.
Web Title – लाडक्या बहिणींनो, कारवाई आधीच अर्ज मागे घ्या… अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागणार!