मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

शेतकर्‍यांवर अस्मानी संकट; ढगाळ वातावरणामुळे ज्वारीसह इतर पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव – Marathi News | Farmers in tension Disease incidence on Jawar and other crops due to cloudy weather

जळगाव जिल्ह्यात सततच्या ढगाळ वातावरणामुळे ज्वारी पिकावर रोगांचा प्रादुर्भाव होत आहे.पिकांसाठी पोषक थंडी नसल्याने तसेच सतत ढगाळ वातावरण असल्याने ज्वारी पिकावर मावा तसेच किडीचा प्रादुर्भाव होत असल्याने पिकांची पाने सुकून पिवळी पडत आहेत. इतर ही पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे. हातातोंडाशी आलेल्या पिकाचं नुकसान होण्याची भीती आहे. तर दुसरीकडे रोजंदारीपेक्षा जादा रोजंदारी देऊनही मजूर मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे.

शेतकरी संकटात

आधीच अवकाळी पावसामुळे झालेला नुकसान त्यातच आता रोगांचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.. चार एकर मध्ये दरवर्षी 120 ते 25 क्विंटल ज्वारीचे उत्पन्न होतं. मात्र यंदा रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे लागवडीचाही खर्च देखील की निघतो की नाही याची चिंता शेतकर्‍यांना सतावत आहे.

हे सुद्धा वाचा

इतर पिके सुद्धा धोक्यात

हे वाचलंत का? -  Fisheries : दुबईतील नोकरी सोडून सुरू केले मच्छीपालन, १५ जणांना दिला रोजगार - Marathi News | 15 people were given employment by fish farming in the village

रोगांचा प्रादुर्भाव होऊन होत असलेल्या नुकसानाकडेही शासनाने लक्ष द्यावे अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. सततच्या ढगाळ वातावरणामुळे ज्वारी बरोबरच हरभरा, गहू , मका या पिकांवर सुद्धा रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. तर रोजंदारीपेक्षा जादा रोजंदारी देऊनही मजूर मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे.

मजूर मिळत नसल्याने कामं खोळंबली

जळगाव जिल्ह्यात ग्रामीण भागात तूर कापण्यासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी आता नव्या अडचणीत सापडला आहे. शेतात तुरीच्या झाडाला मोठ्या प्रमाणावर शेंगा लागल्या आहेत, मात्र तूर कापण्यासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकर्‍याची मोठी अडचण झाली आहे. ठरलेल्या रोजंदारीपेक्षा जादा रोजंदारी देऊनही मजूर मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे.

हे वाचलंत का? -  पंजाबराव डख यांचा नवा हवामान अंदाज.. अवकाळी पाऊस शेतकऱ्यांसाठी आव्हान की संधी?

तालुक्यातील परिसरातील गावांमध्ये मजुरांचा शोध घेण्यासाठी पायपीट करण्याची वेळ शेतकर्‍यावर आली आहे. महिनाभर प्रतीक्षा तसे शोधा शोध करूनही मजूर न मिळाल्याने शेतकर्‍यावर स्वत:च तूर कापणी करण्याची वेळ आली आहे. एकंदरीतच नुकसान त्यातच पाहिजे तसे पैसे खर्च करूनही मजूर मिळत नसल्यामुळे शेतकर्‍यांसमोर संकट उभे राहिले आहे.


Web Title – शेतकर्‍यांवर अस्मानी संकट; ढगाळ वातावरणामुळे ज्वारीसह इतर पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव – Marathi News | Farmers in tension Disease incidence on Jawar and other crops due to cloudy weather

हे वाचलंत का? -  गावरान आंब्याची रसाळी; चवच लय न्यारी, कुठे जपली तीन पिढ्यांनी खास आमराई - Marathi News | Gavaran Aamba, Countryside Mango Aamrai has been preserved like this for three generations mango tastes amazing

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj