मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

वारसनोंद पण आता ऑनलाईन; सरकारचे नागरिकांना नववर्षाचे गिफ्ट, असा करा अर्ज – Marathi News | Heir registration is now also online; State Government New Year’s gift to citizens, apply online

नवीन वर्षात राज्य सरकारने नागरिकांना आणखी एक गिफ्ट दिले आहे. त्यांना ऑनलाईन वारसा नोंद करता येईल. नागरिकांना ई-फेरफार प्रणालीला पूरक असलेल्या ई-हक्क प्रणालीचा (पब्लिक डाटा एन्ट्री) वापर करून वारस नोंद, सात- बारावरील इकरार नोंदी, मयतांचे नाव कमी करणे, अपाक कमी करणे आदी विविध कामे करता येणार आहे. त्यामुळे नागरिकांना तलाठी कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज उरली नाही. असा करता येईल ऑनलाईन अर्ज…

तलाठी सज्जाचे झिजवा उंबरठे

वारस नोंद, बोजा दाखल करणे, बोजा कमी करणे, इकरार नोंदी, मयताचे नांवे कमी करणे, अपाक कमी करणे, , विश्वस्तांचे नाव कमी करणे वा इतर महसूल कामासाठी नागरिकांना तलाठी कार्यालयात जावे लागते. पण अनेकदा एकाच तलाठ्याकडे दोन-तीन गावाचा पदभार असल्याने त्याची आणि नागरिकांची भेट होत नाही. तलाठी आठवड्यातील वार ठरवून येत असला तरी बैठकी आणि इतर व्यापामुळे त्याचा खाडा पडतो. अशावेळी नागरिकांची कामं खोळंबतात. तर छोट्या-छोट्या कामं सुद्धा पैशांशिवाय होत नसल्याची ओरड होते. यावर आता तंत्रज्ञाना आधारे तोडगा काढण्यात आला आहे.

हे वाचलंत का? -  आता लाडक्या बहिणींना मिळणार 2100, तर “या” शेतकऱ्यांची होणार कर्जमाफी! बघा जाहीरनाम्यातील नवे बदल..

हे सुद्धा वाचा

आता ऑनलाईन वारसा नोंद

ऑनलाईन वारसा नोंद करता येईल. नागरिकांना ई-फेरफार प्रणालीला पूरक असलेल्या ई-हक्क प्रणालीचा (पब्लिक डाटा एन्ट्री) वापर करून वारस नोंद, सात- बारावरील इकरार नोंदी, मयतांचे नाव कमी करणे, अपाक कमी करणे आदी विविध कामे करता येणार आहे. नागरिकांना तलाठी कार्यालयात न जाता महसूल संदर्भातील कामे घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने करता येतील.

असा करा ऑनलाईन अर्ज

ई-हक्क प्रणाली आधारे नागरिकांना वारसा नोंद करता येईल. ई-फेरफार आधारे तलाठ्यांना हे काम करता येईल. pdeigr.maharshtra.gov.in या संकेतस्थळावर नागरिकांना सहकारी संस्थांना अगोदर लॉगिन करावे लागेल. त्यासाठी अगोदर साईन-अप, नोंदणी करावी लागेल. त्यानंतर वारस नोंद, बोजा दाखल करणे, बोजा उतरवणे, इकरार नोंदी, मयताचे नावे कमी करणे इतर कामे करता येईल. ई-हक्क प्रणालीचा वापर करून आठ प्रकारच्या नोंदी घरबसल्या करता येतील.

हे वाचलंत का? -  सहनही होईना आणि सांगताही येईना, पूरग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत - Marathi News | Buldhana crop destroyed heavy rain update farmer news in marathi

त्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल. घरबसल्या आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावी लागतील. नागरिक स्वतः या प्रणाली आधारे अथवा महा ई-सेवा केंद्रातून अर्ज करू शकतात. या प्रणालीच्या वापराने तलाठ्याचे काम अधिक सोपे होईल. तर महसूल प्रशासनाच्या कामकाजामध्ये गतिमानता आणि पारदर्शकता येईल.


Web Title – वारसनोंद पण आता ऑनलाईन; सरकारचे नागरिकांना नववर्षाचे गिफ्ट, असा करा अर्ज – Marathi News | Heir registration is now also online; State Government New Year’s gift to citizens, apply online

हे वाचलंत का? -  today forecast : कोकणात मुसळधार पावसाचा जोर वाढला, महाराष्ट्रातील या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता - Marathi News | Maharashtra rain update today kokan declared yello alert

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj