मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

Farmer in Tension : मंगू रोगाने मोसंबीचा गोडवा चोरला; शेतकऱ्यांची वाढली चिंता, पपईसह तुरीवर दवाळ रोगाचं सावट – Marathi News | Mangoo disease stole the sweetness of Mosambi; Worry of farmers increased, and downy mildew on papaya and tur

थंडी आणि मंगू रोगाने मोसंबी उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. इतकेच नाही तर पपई आणि तूर हे पीक सुद्धा संकटात सापडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. हवामान बदलाचा मोठा फटका या पिकांना बसला आहे. जालनासह नागपूर आणि इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर त्यामुळे संकट उभे ठाकले आहे.

20 हजार हेक्टर क्षेत्र मोसंबी संकटात

उत्तर भारतात पसरलेल्या थंडीचा परिणाम आता जालना जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक शेतकरी वर्गावर झालाय.मालाचे घसरलेले दर पाहता अजून दोन दिवस मोसंबी बाजारपेठ अजुन दोन दिवस बंद राहणार आहे. अश्यातच मोसंबी विकसित होण्याच्या स्थितीत असताना मंगू रोगाचं सावट पसरल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला. जिल्ह्यात जवळ पास 20 हजार हेक्टर क्षेत्र मोसंबीची लागवड झाली असल्याने संक्रांती नंतर तरी भाव वाढ होईल का अशी आशा शेतकरी व्यक्त करतं आहे.

हे सुद्धा वाचा

नंदुरबारमधील पपई उत्पादक शेतकरी अडचणीत

नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पपई लागवड केली आहे. वातावरणातील सततच्या बदलावामुळे पपई पिकावर मोझेक व डावनी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे शेतकर्‍यांच्या संपूर्ण पपईच्या बागाच धोक्यात आल्याने शेतकरी अक्षरशः हैराण झाले आहेत. मोझेक रोगामुळे पपईची पान पिवळी पडुन गळून पडत आहेत. त्याचा फटका पपईला बसला आहे. कृषी विभागाने याची दखल घेऊन शेतकर्‍यांना मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा शेतकर्‍यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

हे वाचलंत का? -  Farmer News : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सरकारने घेतला शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय - Marathi News | Now banks will not be able to forcibly recover loans from farmers, arbitrariness has been curbed in this state

तर जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पिकांच्या अंतर्गत मशागतीच्या कामांना वेग आला आहे. खरीप हंगामातील पिकांची काढणी झाल्यानंतर शेतकर्‍यांनी रब्बी हंगामातील पिकांचे नियोजन केले जात असे, मात्र काही शेतकर्‍यांनी लवकर पेरणी केल्याने पिकांची वाढ चांगली झाली आहे. त्यामुळे अंतर मशागतीच्या कामाला चांगलाच वेग आला आहे. रब्बी हंगामात गहू, हरभरा, मका, ज्वारी, कांदा, दादर, भुईमूग, या पिकांची पेरणी करण्यात आली असून या पिकांना खते देणे, कोळपणी निंदणी आदी कामांना वेग आला आहे.

खताचे दर वाढल्याने शेतकरी अचडणीत

नंदुरबार जिल्ह्यात शेतीमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यातच खतांच्या किमती वाढणार असल्याने दुष्काळात तेरावा महिना अशी गत शेतकर्‍यांची झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यात रब्बी हंगामाचे पेरण्या पूर्ण झाल्या असून आता खत दिले जाणार आहे .मात्र ऐन हंगामाच्या वेळेस खतांचे दर वाढण्याची शक्यता असल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे.

हे वाचलंत का? -  शेतकऱ्याने फिरवला वांग्याच्या शेतात ट्रॅक्टर, बाजारात भाव मिळच नसल्यामुळे शेतकरी संतापला - Marathi News | The farmer turned the tractor in the brinjal field, the farmer got angry because the price was not available in the market

अमरावतीत तुरीवर दवाळ रोगाचे सावट

अमरावती जिल्ह्यात अनेक भागात तूर पिकावर दवाळ रोगाच सावट आले आहे. दवाळ रोगामुळे हिरवीगार तूर करपली आहे. तिवसा तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये तूर उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. त्याचा तूर उत्पादनात मोठा फटका दिसले. उत्पादन घटण्याची शक्यता आहे. तर हे नुकसान विमा कंपनीच्या निकषात बसत नसल्याने शेतकरी दुहेरी कात्रीत अडकला आहे.

हे वाचलंत का? -  राज्यात उष्णतेच्या लाटेसह अवकाळी पावसाचा देखील अंदाज - Marathi News | Unseasonal rain in Maharashtra, temperature in the state will rise above 40 degrees marathi news


Web Title – Farmer in Tension : मंगू रोगाने मोसंबीचा गोडवा चोरला; शेतकऱ्यांची वाढली चिंता, पपईसह तुरीवर दवाळ रोगाचं सावट – Marathi News | Mangoo disease stole the sweetness of Mosambi; Worry of farmers increased, and downy mildew on papaya and tur

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj