मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

शेतकर्‍यांसाठी मोदी कॅबिनेटचे गिफ्ट; पीएम पीक योजनेत मोठी अपडेट, DAP वर अतिरिक्त सबसिडी – Marathi News | Modi Cabinet’s Gift to Farmers; Major Update in PM Crop Scheme Additional Subsidy on DAP

पीएम पीक योजनेतील मोठी अपडेट समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत शेतकर्‍यांसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. आता पीएम पीक योजनेचे वाटप 69515 कोटी रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला. रक्कमेत सरकारने मोठी वाढ केली आहे. तर तंत्रज्ञाना आधारे शेतकर्‍यांच्या दावांच्या लवकर निपटारा करण्यात येणार आहे. यासह डाय-अमोनियम फॉस्फेट (DAP) वर अतिरिक्त अनुदान (Subsidy) देण्यात येणार आहे. डीएपीची 50 किलोची बॅग शेतकऱ्यांना 1350 रुपयांना मिळेल. एका बॅगची किंमत जवळपास 3 हजार रुपये इतकी आहे. ती अर्ध्याहून कमी किंमतीत शेतकर्‍यांना देण्यात येईल. जागतिक बाजारात DAP च्या किंमतीत कितीही चढउताराचे सत्र आले तरी त्याचा कोणताही परिणाम शेतकर्‍यांवर होणार नाही.

पीक विमा योजना वाटपात वाढ

केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री पीक विमा योजना आणि हवामान आधारीत पीक विमा योजना 2025-26 पर्यंत सुरू ठेवण्यास मंजूरी दिली आहे. त्यासाठी 2021-22 ते 2025-26 पर्यंत 69,515.71 कोटी रुपयांचा खर्चास मंजूरी देण्यात आली. या निर्णयामुळे 2025-26 पर्यंत देशभरातील शेतकर्‍यांना पीक विमातंर्गत जोखीम संरक्षण मिळेल.

हे वाचलंत का? -  Pune Tomato : महिन्यापूर्वी भाव आता टोमॅटोच्या दरात घसरण, संतप्त शेतकऱ्यांनी रस्तावर फेकले टोमॅटो - Marathi News | Pune Narayangaon Indapur, farmers are aggressive after tomato prices fall down

हे सुद्धा वाचा

तर योजनेत आता तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने पारदर्शकता आणि दावा निपटाऱ्यांचे प्रमाण झटपट करण्यात येईल. याशिवाय केंद्रीय मंत्रिमंडळाने 824.77 कोटींसह इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी फंड (FIAT) तयार करण्यासाठी मंजूरी देण्यात आली आहे. त्यामुळे या क्षेत्रात संशोधनाला आणि विकासाला चालना मिळेल.

डीएपीवर अतिरिक्त विशेष पॅकेजची घोषणा

कॅबिनेटच्या बैठकीत शेतकर्‍यांसाठी अनेक पाऊलं टाकण्यात आली आहेत. स्वस्त डीएपी खत शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अतिरिक्त अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तर एनबीएस सबसिडी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डाय-अमोनियम फॉस्फेट (DAP) वर एक रक्कमी 3,500 रुपये प्रति मॅट्रिक टनाच्या प्रस्तावाला पुढील आदेशापर्यंत मंजूरी देण्यात आली आहे. डाय-अमोनियम फॉस्फेट (DAP) वर अतिरिक्त अनुदान (Subsidy) देण्यात येणार आहे. डीएपीची 50 किलोची बॅग शेतकऱ्यांना 1350 रुपयांना मिळेल. एका बॅगची किंमत जवळपास 3 हजार रुपये इतकी आहे.

हे वाचलंत का? -  अवकाळी पावसाने शेतीतील उभे पीक आडवे…निवडणुकीच्या रणधुमाळीत शेतकऱ्यांचे आश्रू पुसणार कोण?


Web Title – शेतकर्‍यांसाठी मोदी कॅबिनेटचे गिफ्ट; पीएम पीक योजनेत मोठी अपडेट, DAP वर अतिरिक्त सबसिडी – Marathi News | Modi Cabinet’s Gift to Farmers; Major Update in PM Crop Scheme Additional Subsidy on DAP

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj