मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

कांदा आणि लसण राजकीय समीकरणं बिघडवणार?; तुटवडा वाढल्याने झाली दरवाढ, ऐन हिवाळ्यात ग्राहकांना फुटला घाम

कांद्यासह लसणाच्या किंमती भडकल्या

कांदा आणि लसणाने ऐन निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचं टेन्शन वाढवलं आहे. मुंबईत कांदा आणि लसणाच्या तुटवड्याने मुंबईकरांच्या जेवणाची चव हरवली आहे. कांदा आणि लसणाच्या पेस्टने रोजच्या जेवणाला रंगत येते. ते रूचकर आणि चविष्ट लागते. पण या दोन महत्त्वाच्या जिन्नसच हरवल्याने मुंबईकरांच्या जेवणाची चव हरवली आहे. कांदा आणि लसणाच्या तुटवड्याने किंमती वाढल्या आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर नागरिकांनी दरवाढीवर नाराजी व्यक्त केली आहे.

असा वाढला भाव

मुंबईतील बाजारात कांदा आणि लसणाचा तुटवडा निर्माण झाला आहे. कांदा ८० रुपये किलोवर तर लसूण ४०० रुपये किलोवर गेला आहे. मुंबईत किरकोळ बाजारात कांदा ६० ते ८० रुपये किलो दराने विक्री होत आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांदा आणि लसणाची आवक कमी झाल्यामुळे तुटवडा जाणवत आहे. पुढील महिनाभर कांद्याचे आणि तीन – चार महिने लसणाचे वाढ चढेच राहणार आहेत.

हे सुद्धा वाचा

हे वाचलंत का? -  महाराष्ट्र लाडकी बहिण तिसऱ्या हप्त्याचे 4500 रुपये “या” महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात.. पहा यादीतील तुमचे नाव…

का झाला तुटवडा

दिवाळीनिमित्त नाशिक परिसरात कांद्याची खरेदी – विक्री आठवडाभर बंद होती. परिणामी बाजारांत काद्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांकडील उन्हाळी कांदा जवळपास संपला आहे. किरकोळ प्रमाणात दोन ते पाच टक्के उन्हाळी कांदा शेतकर्‍यांकडे शिल्लक आहे. या सर्वाचा परिणाम म्हणून पुणे, मुंबईसह राजधानी दिल्लीत दर्जेदार कांद्याचे दर ८० रुपयांवर गेले आहेत. खरीप हंगामातील नुकताच काढलेला, पाण्याचे प्रमाण जास्त असलेला कांदा ६० रुपये किलो दराने विक्री होत आहे.

कांद्याचे भाव भडकणार?

हे वाचलंत का? -  टोमॅटोच्या झाडाला लागलेत बटाटे, शेतकऱ्यांना दुहेरी फायदा देणारे तंत्रज्ञान - Marathi News | Potatoes and tomato in one plant, tree grown in agricultural exhibition in Baramati marathi news

कांद्याचे भाव आणखी महिनाभर वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सुद्धा कांदा आणि लसणाची आवक कमी झाल्याने हा तुटवडा जाणवत आहे. दिवाळीमुळे नाशिक परिसरात कांद्याची खरेदी-विक्री आठवडाभर बंद होती. यंदा पावसाने कांद्या मोठ्या प्रमाणात खराब केला आहे. खरीप कांद्याच्या काढणीवर त्याचा परिणाम दिसून आला. उत्पादनात मोठी घट झाल्याने बाजारात कांद्याचा तुटवडा आला आहे. आता या समस्येवर सरकारला लवकरात लवकर तोडगा काढावा लागणार आहे. नाहीतर कांदा हा विधानसभा निवडणुकीतील मुद्दा व्हायला वेळ लागणार नाही.

हे वाचलंत का? -  सोयाबीन विकताय का? सध्या मिळतोय 'हा' दर..!


Web Title – कांदा आणि लसण राजकीय समीकरणं बिघडवणार?; तुटवडा वाढल्याने झाली दरवाढ, ऐन हिवाळ्यात ग्राहकांना फुटला घाम – Marathi News | Onion And Garlic Price Hike Onion and garlic harm Mumbaikars; Due to the increase in the shortage, the prices increased, and in winter, the customers broke a sweat

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj