मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

सोयाबीन विकताय का? सध्या मिळतोय ‘हा’ दर..!

Soybean Rates : सध्या राज्यात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतकर्‍यांना सोयाबीन काढण्याची संधी मिळाली आहे. अनेक शेतकर्‍यांनी सोयाबीन काढून घरी आणला आहे. तर काही शेतकरी मिळेल त्या भावात व्यापाऱ्याला सोयाबीन देऊ लागले आहे, अशा शेतकर्‍यांचा मोठा तोटा होत आहे.

केंद्र तसेच राज्य सरकारकडून वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आल्या असल्या तरी देखील सोयाबीन, उडीद आणि मुगाला अजूनही हमीभाव मिळत नाहीये. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दराने आपल्या शेतीमालाची विक्री करावी लागत असल्याने शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात बाजार समित्यांमध्ये खरीप हंगामात सोयाबीन, उडीद आणि मुगाची आवक वाढली आहे. मराठवाडा आणि विदर्भात सोयाबीनची आवक वाढली आहे. अमरावती, अकोट, जालना आणि वाशीम याठिकाणी सोयाबीनची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. शनिवारी जालन्यात तर सर्वाधिक म्हणजेच 20 हजार 706 क्विंटल सोयाबीन बाजारात आले होते. सध्या सोयाबीनला 4 हजार 892 रुपये एवढा हमीभाव जाहीर झालेला असताना देखील खरिपातील या नव्या सोयाबीनला सरासरी 4,500 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळत आहे.

आजचे सोयाबीन बाजार भाव (Soybean Bajar Bhav)

हे वाचलंत का? -  सोयाबीन पिकावर या रोगाचा हल्ला; असा करा बंदोबस्त..!

(1) जळगाव :
दि. 07 ऑक्टोबर 2024 (वार – सोमवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक  –  250 क्विंटल
जात – —-
कमीत कमी दर – 3925
जास्तीत जास्त दर – 4420
सर्वसाधारण दर – 4300

(2) बार्शी :
दि. 07 ऑक्टोबर 2024 (वार – सोमवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक  – 2910  क्विंटल
जात – —-
कमीत कमी दर – 3500
जास्तीत जास्त दर – 4500
सर्वसाधारण दर – 4000

(3) छत्रपती संभाजीनगर :
दि. 07 ऑक्टोबर 2024 (वार – सोमवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक  – 197 क्विंटल
जात – —-
कमीत कमी दर – 3000
जास्तीत जास्त दर – 4252
सर्वसाधारण दर – 3626

(4) सोलापूर :
दि. 07 ऑक्टोबर 2024 (वार – सोमवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक  – 363 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 3300
जास्तीत जास्त दर – 4330
सर्वसाधारण दर – 4060

(5) सांगली :
दि. 07 ऑक्टोबर 2024 (वार – सोमवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक  –  100 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 4900
जास्तीत जास्त दर – 5100
सर्वसाधारण दर – 5000

हे वाचलंत का? -  Pune Farmer | काही महिन्यांपूर्वी टोमॅटोने तर आता डाळिंबाने दिला सर्वोच्च भाव - Marathi News | Pomegranate farmer got the highest price in pune district market committee

(6) नागपूर :
दि. 07 ऑक्टोबर 2024 (वार – सोमवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक  – 366 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 4100
जास्तीत जास्त दर – 4311
सर्वसाधारण दर – 4258

(7) लातूर – मुरुड :
दि. 07 ऑक्टोबर 2024 (वार – सोमवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक  – 473 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 4200
जास्तीत जास्त दर – 4400
सर्वसाधारण दर – 4300

हे वाचलंत का? -  “या” शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पिक विमा नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात.. जाणून घ्या सविस्तर!

(8) चाळीसगाव :
दि. 07 ऑक्टोबर 2024 (वार – सोमवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक  – 30 क्विंटल
जात – पिवळा
कमीत कमी दर – 3621
जास्तीत जास्त दर – 3765
सर्वसाधारण दर – 3700


Web Title – सोयाबीन विकताय का? सध्या मिळतोय ‘हा’ दर..!

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj