मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

आता मजल्यानुसार सिडकोच्या घरांच्या किमती; तब्बल 26 हजार घरांची योजना, पहा मजल्यानुसार किंमती..!

नवी मुंबईत फ्लॅट (2 bhk flat Navi Mumbai) घ्यायचा विचार केला तर मोठ्या बजेटचा देखील विचार करावा लागतो. कारण इथे घरांच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत. पण अशी परिस्थिती असताना सुद्धा तुम्हाला नवी मुंबईत स्वस्तात घर मिळू शकते. फक्त त्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल. म्हाडा-सिडकोकडून मुंबई – नवी मुंबईत परवडणाऱ्या घरांची लॉटरी काढली जात आहे. आता सिडकोच्या इतिहासामधील सर्वांत मोठ्या गृह योजनेचा (Housing Scheme) शुभारंभ 7 ऑक्टोबर होत असून यात पंतप्रधान आवास योजनेंतर्गत आर्थिक दुर्बल गटासाठी आणि अल्प उत्पन्न गटासाठी घरे असणार आहेत. महत्वाचे म्हणजे ही सर्व घरे बाजारभावापेक्षा कमी किमतीत असणार आहेत.

सिडकोच्या या घरांचे बांधकाम शहराच्या वेगवेगळ्या नोडमध्ये सुरू आहे आणि या घरांच्या किमती मजल्यानुसार आकारण्यात येणार आहेत. वरच्या मजल्यावर घर घेण्याची इच्छा असणार्‍या ग्राहकांना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. मजल्यावरनुसार फ्लॅटचे पैसे कसे असणार? याची माहिती देखील आपण पुढे पाहिली आहे.

हे वाचलंत का? -  Bird Flu : चंद्रपूरमध्ये बर्ड फ्लूची एंट्री, 10 किलोमीटर परिसर अलर्ट झोन, यंत्रणांची उडाली धावपळ - Marathi News | Bird Flu entry in Chandrapur after Latur, Nashik, and Thane, areas around 10 kilometers declared alert zone H5N1

सिडको संचालक मंडळाने यासंदर्भात असलेल्या ठरावाला मान्यता दिली आहे. सिडकोकडून 67 हजार घरांचे बांधकाम 27 ठिकाणी करण्यात येत आहे. यातील 43 हजार घरांना महारेरा’ कडून परवानगी मिळाली आहे. याच घरांमधील 26 हजार घरांची लॉटरी 7 ऑक्टोबर रोजी होणार आहे. यातील 50 टक्के घरे एकट्या तळोजा नोडमध्ये आहेत. तसेच खारकोपर, खांदेश्वर तसेच मानसरोवर आणि बामणडोंगरी या गृह प्रकल्पांतील शिल्लक घरांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे.

मजल्यानुसार फ्लॅटचे दर  (Flat rates)

फ्लॅट कितव्या मजल्यावर यावर घराचे दर ठरणार आहे. बावीस मजली असलेल्या या टोलेजंग इमारतींमधील सातव्या मजल्यावर असलेल्या फ्लॅटसाठी प्रति चौरस फूट 10 रुपये अतिरिक्त आकारणी करण्यात येणार आहे. त्यावरील मजल्यावर असलेल्या फ्लॅटसाठी प्रति चौरस फुटाला रुपये दहाच्या पटीने अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार आहे. जसे की सातव्या मजल्यावर अतिरिक्त 10 रुपये प्रति चौरस फुट वाढेल तर आठव्या मजल्यावर 20 रुपये प्रति चौरस फुट वाढेल, अशा पद्धतीने ही वाढ असणार आहे.

हे वाचलंत का? -  कांद्याचे दर वधारले, विक्रीतून शेतकरी नव्हे तर केंद्र सरकार मालामाल, किलो मागे सरकारला असा होतोय नफा - Marathi News | Central government Profit from the sale of onion, 7 to 18 rupees per kg marathi news


Web Title – आता मजल्यानुसार सिडकोच्या घरांच्या किमती; तब्बल 26 हजार घरांची योजना, पहा मजल्यानुसार किंमती..!

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj